शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहीद सुभेदार अजय ढगळे यांचे पार्थिव रत्नागिरीत दाखल, जिल्हा प्रशासनाने दिली मानवंदना

By शोभना कांबळे | Updated: April 3, 2023 19:31 IST

उद्या मंगळवारी पार्थिव त्यांच्या मूळ गावी मोरवणे येथे नेण्यात येणार

रत्नागिरी : सिक्कीम येथे कर्तव्यावर असताना शहीद झालेले मोरवणे (ता. चिपळूण) गावचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे यांचे पार्थिव आज, सोमवारी रत्नागिरीत आणण्यात आले. येथील विमानतळावर पार्थिव आले असता जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.भारत-चीन सीमेवर देशसेवा बजावताना शहीद झालेले सुभेदार अजय ढगळे यांचे पार्थिव सोमवारी सायंकाळी रत्नागिरी विमानतळावर पोहचले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीकांत गायकवाड, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना  पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.2STC मडगाव (गोवा) येथील एक ज्युनिअर ऑफीसर सुभेदार आलम व १७ जवान यांनी गार्ड ऑफ ऑनर दिले.  १०८ इंजिनिअर रेजिमेंटरचे मेजर शिवकुमार एस.एन. यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.  तटरक्षक दलाचे स्टेशन कमांडर, तटरक्षक दलाचे जवान, पोलीस विभागाचे अधिकारी, माजी सैनिकांचे प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण, मोरवणे गावातील ग्रामस्थांचे प्रतिनिधी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे प्रतिनिधी गणेश धुरी, पत्रकार, माजी सैनिक यांनी श्रध्दांजली वाहिली.  विमानतळावरुन सुभेदार ढगळे यांचा पार्थिव उद्या मंगळवारी सकाळी ५.१५ वाजता त्यांच्या मूळ गावी मोरवणे येथे नेण्यात येणार आहे. चिपळूण तालुक्यातील बहादूरशेख नाक्यापासून मोरवणे गावापर्यंत शहीद सुभेदार ढगळे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागेची रेकी करण्यासाठी गेले असता झालेल्या भुस्खलनात  शहीद झाले. शहीद अजय ढगळे हे कारगील याआधी झालेल्या लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या जांबाज बहादुर टिममध्ये देखील होते. त्यांच्या निधनाने चिपळूण तालुक्यासह जिल्हयात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी