शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीच्या समुद्रात बुडालेल्या पाचगणीच्या युवकाचा मृतदेह सापडला, १६ तासांनी लागला शोध

By अरुण आडिवरेकर | Updated: October 10, 2022 14:12 IST

पाच जणांना वाचवण्यात यश

दापोली : तालुक्यातील कर्दे समुद्रात सहा जण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली. यातील वाई (ता. सातारा) येथील पाच जणांना वाचविण्यात यश आले असून, सौरभ धावडे (रा. पाचगणी, महाबळेश्वर) हा १८ वर्षीय युवक समुद्राच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाला हाोता. १६ तासांनी या युवकाचा मृतदेह बुडालेल्या ठिकाणाहून काही अंतरावर सापडला.कार्तिक घाडगे (२०), यश घाडगे (१९), दिनेश चव्हाण (२०), अक्षय शेलार (१९), कुणाल घाडगे (३०, सर्व रा. एकसर, ता. वाई, सातारा) आणि सौरभ धावडे हे सहा जण दापोली तालुक्यातील कर्दे येथे दुचाकी घेऊन फिरण्यासाठी आले होते. त्यांनी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यालगत तंबू उभारला होता. तेथे आपले साहित्य ठेवून सर्व जण पोहण्यासाठी समुद्रात गेले होते. ते समुद्रात उतरले त्यावेळी ओहोटी होती. समुद्राच्या पाण्यात आंघोळ करत असतानाच पायाखालची वाळू घसरली आणि ते समुद्रात जाऊ लागले.त्यांनी आरडा ओरडा करताच समोरच हॉटेलमध्ये असलेल्या ओंकार नरवणकर व मकरंद तोडणकर यांनी दोरीसह धाव घेतली. त्यांनी दोरी समुद्रात फेकून त्यांना वाचविण्याचा अतोनात प्रयत्न केला. त्यात पाच जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, सौरभ धाडवे याचा हात सुटला आणि तो समुद्रात ओढला गेला. पोलिसांनी स्थानिकांसोबत उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला. मात्र, बेपत्ता सौरभ धावडे याचा कोठेच शोध लागला नाही. सोमवारी सकाळी पुन्हा पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. त्यावेळी बुडालेल्या ठिकाणाहून काही अंतरावर त्याचा मृतदेह सापडला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

पर्यटकांना वाचविण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर कोणत्याही प्रकारची यंत्रणा नाही. कर्दे समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा व्यवस्था म्हणून लाईफ जॅकेट, दोरी, बोया हे साहित्य ठेवण्यात आले आहे. परंतु, एखादी बोट असणे गरजेचे आहे. त्यामुळे समुद्रात बुडणाऱ्या तरुणाला वाचवणे शक्य होणार आहे. - सचिन तोडणकर, सरपंच

माशावर मारला तावहे सहा जण शनिवारी (८ ऑक्टोबर) दुचाकीने आले होते. रात्री त्यांनी खेड पेट्रोलपंप येथे मुक्काम केला. रविवारी सकाळी लवकर हर्णै बंदरात जाऊन त्यांनी मासे खरेदी केले. माशावर ताव मारून ते दुपारी १ च्या दरम्यान कर्दे येथे दाखल झाले. किनाऱ्यावर दुचाकी पार्क करून ते समुद्रात आंघोळीसाठी उतरले अन् समुद्रात ओढले गेले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdrowningपाण्यात बुडणे