शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मिर्‍या-पंधरामाड समुद्रकिनारी भरकटलेले 'बसरा' जहाज तब्बल तीन वर्षांनी हटविणार

By अरुण आडिवरेकर | Updated: April 26, 2023 13:00 IST

रत्नागिरी : शहरालगतच्या मिर्‍या-पंधरामाड समुद्रकिनारी भरकटत आलेले शारजाचे ‘बसरा’ जहाज तब्बल तीन वर्षानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी तेथून हटवले जाणार ...

रत्नागिरी: शहरालगतच्या मिर्‍या-पंधरामाड समुद्रकिनारी भरकटत आलेले शारजाचे ‘बसरा’ जहाज तब्बल तीन वर्षानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी तेथून हटवले जाणार आहे. या जहाजाचे भंगार साहित्य काढून पूर्णपणे हटल्यानंतर तेथील टेट्रापॉडचा बंधारा टाकण्यातील अडथळाही दूर होणार आहे.शारजाचे ऑईल टँक बसरा जहाज डिझेल घेऊन श्रीलंकेकडे जात होते. ३ जून २०२० रोजी निसर्ग वादळाचा धोका असल्याने हे जहाज आश्रयासाठी रत्नागिरी शहरातील भगवती बंदरात आले होते. नांगर टाकून हे जहाज समुद्रात उभे होते.समुद्रातील जोरदार वारे आणि लाटांच्या मार्‍याने या जहाजाचा नांगर तुटला आणि हे जहाज भरकटत मिर्‍या-पंधरामाड समुद्रकिनारी खडकात येऊन अडकले. तब्बल ३ वर्षे हे जहाज याच ठिकाणी अडकून आहे.पाऊस आणि समुद्री लाटांच्या तडाख्यांनी हे जहाज पूर्णपणे निकामी झाल्याने ते भंगारात काढण्यात आले. स्थानिक उद्योजकाने हा व्यवहार केला. त्यानंतर शासन स्तरावरील प्रक्रिया सुरू झाली. ती आता अंतिम टप्प्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाचे वस्तू व सेवाकर भरल्यानंतर हे जहाज तेथून हटवण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तब्बल तीन वर्षानंतर समुद्रकिनारी हेलकावे खात अडकून पडलेले बसरा जहाज पावसाळा सुरू होण्यापूर्वी तेथून पूर्णपणे काढले जाणार आहे.मिर्‍या पंधरा माड भागात अडकून पडलेल्या या जहाजामुळे तेथील धूपप्रतिबंधक बंधार्‍याच्या कामात अडथळे येत होते. येथील १५ ते २० मीटर लांबीच्या बंधार्‍याचे काम सोडून पुढील काम करावे लागत होते. त्यामुळे आता लवकरच जहाजाच्या ठिकाणी रखडलेला बंधाराही पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग