शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

'त्या' बांग्लादेशींचे भारतात १० वर्षाहून अधिक वास्तव्य, २ वर्ष मुंबईतही!

By संदीप बांद्रे | Updated: October 6, 2023 14:45 IST

खेर्डीत ८ वर्षे वास्तव्य, कुटुंबात ११ सदस्यांचा समावेश

संदीप बांद्रे, चिपळूण: बांग्लादेशातून भारतात अवैधरित्या खूसघोरी केलेल्या तिघांना चिपळूण पोलिसांनी खेर्डी येथून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे देखील हे  कुटुंब वास्तव्याला होते. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या मदतीने तपास केला जात आहे. हे कुटुंब भारतात गेल्या १० वर्षापासून वास्तव्याला आहे. त्यांच्या कुटुंबात ११ सदस्यांचा समावेश आहे.

दोन दिवसांपुर्वी खेर्डी येथून गुल्लू हुसेन मुल्ला (५६), जिलानी गुल्लू मुल्ला (२६), जॉनी गुल्लू मुल्ला (२९, तिघेही बांग्लादेश) या तिघांना रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर या तिघांना चिपळूण पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले होते. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांची चिपळूण पोलिसांनी कसून चौकशी केली असतानाच ते खेर्डी येथे राहण्यापुर्वी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दोन अडीच वर्षे वास्तव्याला होते. त्यानंतर खेर्डी मोहल्ला येथे गेल्या सात आठ वर्षापासून ते वास्तव्याला आहेत. तीन खोल्यांमध्ये हे कुटुंब वास्तव्य करीत आहे. त्यांच्या कुटुंबात महिला व मुलांसह ११ जणांचा समावेश आहे.

खेर्डी येथे मुल्ला हे कुटुंब बांधकाम क्षेत्रात सेंट्रींगची कामे करतात. पुर्ण कुटुंब या कामात आहेत. नवीन मुंबई येथे देखील हेच काम ते करत होते. त्यामुळे चिपळूण पोलिसांच्या पथकाने कोपरखैरणेसह मुंबई क्षेत्रात संबंधीत कुटुंबापैकी कोणावर गुन्हा अथवा तक्रार दाखल आहे का, तसेच ते कोणत्या मार्गाने भारतात आले, घुसखोरी कशा पद्धतीने केली. अशा अनेक प्रश्नांचा उलघडा या तपासाच्या निमीत्ताने केला जात आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून १५ हजार रूपये रोख रक्कम, प्रत्येकी ५ हजार रूपये किमतीचे विवो कंपनीचे मोबाईल, आधार कार्ड, पॅनकार्ड व निवडणूक ओळखपत्र जप्त केले आहे. त्यांच्याकडील या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

टॅग्स :ChiplunचिपळुणBangladeshबांगलादेश