शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

अल्ट्राटेक सिमेंटचे रत्नागिरी येथील कार्यालय सील करण्याचे तहसीलदारांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 18:35 IST

अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीला मिऱ्या येथील जमीन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी भाडेपट्ट्यानी दिली आहे. या जमिनीचा कंपनी औद्योगिक वापर करत असल्याने आणि वापरास कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याने रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी याबाबत कंपनीस नोटीस देऊन खुलासा मागवला होता.

रत्नागिरी : भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनीवर पूर्व परवानगी न घेता औद्योगिक वापर केल्याचा ठपका रत्नागिरीतील अल्ट्राटेक कंपनीवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी ठोठावलेला दंड दोन दिवसात न भरल्यास अल्ट्राटेक सिमेंटचे रत्नागिरी येथील कार्यालय सील करण्याचे आदेश तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिले आहेत.तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीला मिऱ्या येथील जमीन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी भाडेपट्ट्यानी दिली आहे. या जमिनीचा कंपनी औद्योगिक वापर करत असल्याने आणि वापरास कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याने रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी याबाबत कंपनीस नोटीस देऊन खुलासा मागवला होता. हा खुलासा समाधानकारक नसल्याने सन १९८१ पासून अनधिकृत बिनशेती वापर करीत असल्याने कंपनीस रक्कम ८ लाख ५५ हजार ६८५  रुपये इतका दंडाचा आदेश करण्यात आला आहे.हा दंड भरणेबाबत कंपनीस दोन नोटीस देण्यात आलेल्या होत्या. तथापि आज अखेर कंपनीने दंडाची रक्कम भरलेली नाही. कंपनीने दोन दिवसात दंडाची रक्कम न भरल्यास २ डिसेंबर रोजी झाडगाव येथील कंपनीच्या कार्यालयातील मनुष्यबळ विभाग (HR SECTION) सील करण्याचे लेखी आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या निवासी नायब तहसीलदार व मंडल अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच या कार्यवाहीत कोणताही अडथळा आणल्यास संबंधितांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी