शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

कामांमुळे शिक्षक हतबल

By admin | Updated: October 15, 2015 00:46 IST

दापोली तालुका : अशैक्षणिक कामांचा बोजा

दापोली : शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत असा शासननिर्णय असूनही शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी जूंपले जात असल्याने शिक्षकवर्गात कमालीची नाराजी आहे. विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत असल्याने पालकांमधून शासनाच्या या धोरणाविरूध्द संताप व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक जनगणना आणि आपत्कालीन व्यवस्थापन सारखी कामे वगळून शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक काम देण्यात येऊ नये असा शासननिर्णय आहे. शिक्षकाने जास्तीतजास्त वेळ अध्यापनाला दिल्याने यातून सक्षम भावी पिढी घडेल. सन २०२०पर्यंत भारत महासत्ता करण्याच्या दृष्टीने उचलेलेले महत्वाचे पाऊल म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात होते. हा निर्णय होऊनही सरल प्रणालीच्या नोंदी, आमआदमी विमा योजनेचे अर्ज भरून घेणे ते आॅनलाईन अपलोड करणे, विद्यार्थ्यांचे शाळा स्तरावर जातीचे, उत्पन्नाचे वास्तव्याचे दाखला मागणी अर्ज भरून घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून घेणे, राष्ट्रीय स्वच्छता अभियान अंतर्गत पथनाट्य, जनजागृती फेरी विविध स्पर्धा घेऊन ग्रामस्थांना सजग करणे, गावातील शौचालयांची संख्या मोजून प्रत्येक शिक्षकांवर सोपवलेल्या कुटुंबाचा पाठपुरावा करणे, पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून नदी ओढ्यांना किमान १० बंधारे बांधणे या आणि अशा प्रकारच्या विविध कामांना शिक्षकांना जुंपले जात आहे.शाळा विद्यालयामधील भरतीवर असणाऱ्या बंदीमुळे कमी कर्मचारी असतानाही शासनाकडून विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी होणारी शिक्षकांची ससेहोलपट पाहता शैक्षणिक गुणवत्तेचा टक्का घटण्याची भिती जाणकारांनी व्यक्त केली आहे. सरल प्रणाली, आमआदमी योजना, पायाभूत चाचणी गुण ही माहिती संगणकावर आॅनलाईन भरण्याची सक्ती आहे. सरल प्रणालीची माहिती शाळेच्या बाहेर भरल्यास कठोर कारवाईचे आदेश देताना जिल्ह्यातील ७५ टक्के शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नाही तर ५० टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा शासनाने पुरवलेली नाही या गोष्टींकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले आहे. महिना अखेर होणारी सहामाही परीक्षा, १० वी १२ वी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे आॅनलाईन प्रवेश अर्ज भरणे, सहामाहीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करणे अशा जबाबदाऱ्या कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने शाळांना पूर्ण कराव्या लागत आहेत. शाळेच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती परीक्षा, सहशालेय उपक्रम क्रीडा स्पर्धा यांच्याकडे लक्ष पुरवण्यासाठी शिक्षक शाळेच्या वेळेपूर्वी येतात व शाळा सुटल्यानंतरही जादा वेळ काम करतात. यामध्ये शासनाच्या विविध योजनांचा भार शिक्षकांवरच सोपवला जात असल्याने शिक्षकांच्या या समस्या सोडवायला आणि भावी विद्यार्थी पिढीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सर्वसामान्यांना रस्त्यावर उतरावे लागणार असेच चित्र सध्या दिसत आहे. (प्रतिनिधी)शिक्षण विभाग : प्रश्नपत्रिकाच दिलेल्या नाहीतपायाभूत चाचणीचे नियोजन देऊन चाचणीचा प्रत्यक्ष दिवस उजाडला तरी तोंडी परीक्षांचे तर काही ठिकाणी लेखी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकाच दिलेल्या नाहीत. काही ठिकाणी शाळांनाच झेरॉक्स काढायला सांगून त्यांना आर्थिक भूर्दंड देण्याचा प्रकार घडल्याने शासनाच्या धोरणांबाबत कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. कारवाईचे दाखवले भयप्रत्येक कामाला वेळेचे बंधन देऊन कारवाईचे भय दाखवून शिक्षकांना काम करण्यास भाग पाडले जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर याचा परिणाम होण्याच्या शक्यतेने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.