शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

शिक्षकांप्रमाणे पालक-समाजही तेवढाच जबाबदार

By admin | Updated: July 12, 2014 00:37 IST

गुरूपौर्णिमा विशेष : शिक्षक-विद्यार्थ्यांमधील नातं बदलतंय...

रत्नागिरी : गुरू-शिष्याच्या नात्याला आज शिक्षक - विद्यार्थी अशाच नात्याचं स्वरूप आलं आहे. गुरू-शिष्य या शब्दांनाच खूप अर्थ आहेत. आताच्या काळात तसे गुरू आणि तसे शिष्य अपवादानेच सापडतात. काळाच्या ओघात या नात्यात खूप बदल झाले आहेत. पण, जे शिक्षक विद्यार्थ्यांना समजून घेऊन वागतात, त्यांच्याबद्दल अजूनही विद्यार्थ्यांच्या मनात आदरभाव दिसतो, तो कृतीतून व्यक्त होतो. म्हणूनच विद्यार्थ्यांशी असलेले शिक्षकाचे नाते गुरू-शिष्याचे नाते ठरावे, यासाठी शिक्षक, पालक आणि समाज या साऱ्यांचीच जबाबदारी महत्त्वाची ठरते.उद्या शनिवारी गुरूपौर्णिमा आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’च्या रत्नागिरी कार्यालयात परिचर्चा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. गुरू-शिष्यांमधील नातं बदलतंय का? या मुख्य विषयावर ही चर्चा झाली. या चर्चेत श्रीमान गंगाधरभाऊ गोविंद पटवर्धन स्कूलचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण, फाटक प्रशालेच्या दाक्षायिणी बोपर्डीकर, शिर्के प्रशालेच्या गुरूकुल प्रकल्पाचे प्रमुख राजेश आयरे आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. आनंद आंबेकर यांनी या विषयावर विविध मते मांडली.चर्चेची सुरूवात ‘गुरू-शिष्य’ याच शब्दावरुन झाली. आज गुरू-शिष्य म्हणण्यासारखी पिढी दिसत नाही. आज अवती-भोवती दिसतात ते शिक्षक आणि विद्यार्थी. हे नातं अधिक व्यवहारी झालं आहे, असं मत प्रतापसिंह चव्हाण यांनी मांडले. शिक्षण प्रक्रिया, पुस्तकं आणि अभ्यासक्रमांचे बदलते स्वरूप यासारख्या अनेक गोष्टींचा परिणाम शिक्षक-विद्यार्थी नात्यावर होतोय, असं मत दाक्षायिणी बोपर्डीकर यांनी मांडलं. हे नातं सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही अर्थांनी बदलतंय, असंही मत त्यांनी मांडलं. जे शिक्षक आज विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेऊन त्यांना दिशा दाखवतात, त्या शिक्षकांबद्दल आजही विद्यार्थ्यांमध्ये आदरभाव दिसतो, असे मत प्रा. आनंद आंबेकर यांनी प्रकर्षाने मांडले. शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याचा विचार करताना समाजरचनेचा प्राधान्याने विचार करायला हवा. कारण समाजरचनेचा या नात्यावर खूप परिणाम होतोय, असे मत राजेश आयरे यांनी मांडले.विद्यार्थ्यांच्या मनातला त्यांच्या शिक्षकांबद्दलचा आदर कायम राहील किंवा वाढेल, असं वर्तन पालकांकडून घडायला हवं, असा मुद्दाही या चर्चेतून पुढे आला. शिक्षक-विद्यार्थ्यांमधील नातं अधिक सुदृढ होण्यासाठी मुळात शिक्षकांनी मित्र आणि पालक (ा१्रील्ल िंल्ल िॅ४ं१्िरंल्ल) अशा दोन्ही भूमिकांमधून विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधायला हवा. त्याला पालक आणि समाजाकडून तशीच जोड मिळायला हवी, असा निष्कर्ष या चर्चेतून पुढे आला. (प्रतिनिधी)