शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

शिक्षकांचे पगार जाणार लांबणीवर!

By admin | Updated: April 8, 2015 23:54 IST

माध्यमिक विभाग : वारंवारच्या घटनेने नाराजी

टेंभ्ये : माध्यमिक शिक्षकांचे मार्च महिन्याचे एप्रिलमध्ये जमा होणारे पगार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाकडून अद्याप पगार अनुदान प्राप्त न झाल्याने पगार उशिरा जमा होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. मार्च महिन्याचे पगार लांबणीवर पडणे हे कायमचेच झाले असल्याने शिक्षक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. ‘शालार्थ’ ही आॅनलाईन वेतन प्रणाली सुरु झाल्यापासून अपवाद वगळता एक तारखेला पगार जमा झाल्याचे पाहायला मिळत नाही. प्रत्येक वेळी पगारास होणाऱ्या विलंबास नेमके कारण काय? असा प्रश्न संघटना स्तरावरून उपस्थित केला जात आहे.आर्थिक वर्षअखेर म्हणून मार्च महिन्याकडे पाहिले जाते. मार्च महिन्याचा पगार उशीरा होत असल्याने माध्यमिक शिक्षकांना एप्रिल महिन्यात आर्थिक घडी बसविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यावर्षी अद्याप वेतन अनुदानच जमा झाले नसल्याने पगार लांबणीवर पडणार हे निश्चित झाले आहे.आगामी चार दिवसात अनुदान जमा झाल्यास २० मेपर्यंत शिक्षकांना पगार मिळू शकतो. अनुदान प्राप्त होण्यास उशीर झाल्यास पगार अधिक लांबणीवर जाऊ शकतो, असे मत वेतन पथक विभागातून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे मार्च महिना उशिराने होणारे पगार यामुळेच माध्यमिक शिक्षकांच्या कायम लक्षात राहतो.माध्यमिक वेतन पथक विभागाला सध्या पूर्णवेळ अधीक्षक नसल्याने ‘शालार्थ’ ही आॅनलाईन प्रणाली कार्यान्वित होऊनदेखील जिल्ह्यात माध्यमिक शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत. जवळपास मार्च २०१२ पासून माध्यमिक वेतन पथक विभागास पूर्णवेळ अधीक्षक नाही. प्रत्येकवेळी या पदाचा अतिरिक्त कार्यभार समक्ष अधिकाऱ्याकडे दिला जातो. यामुळे या विभागाचे काम प्रत्येक वर्षाला प्रलंबित राहते. माध्यमिक शिक्षकांच्या पगाराकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे.एक तारखेला पगार हा नियम रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत कधी सत्यात उतरणार आहे? असा प्रश्न विचारला जात असल्याचे माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत घुले यांनी स्पष्ट केले. परंतु याबाबत शिक्षण विभागाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)आॅनलाईनमुळे उर्वरित खात्यांचे पगार वेळेत आणि जलदगतीने होत असताना दुसरीकडे शिक्षण खात्याचे पगार मात्र याच प्रणालीमुळे उशिराने होताना दिसत आहे.