असुर्डे : चिपळूण तालुक्यातील कोकरे प्रशालेचे मुख्याध्यापक व इंग्रजीचे उत्कृष्ट शिक्षक संभाजी ढेकळे हे सेवानिवृत्त झाले. तसेच ज्येष्ठ विज्ञान शिक्षक पंडित फडतरे हेही प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचा प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला़
कोविड - १९ प्रादुर्भावामुळे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थाध्यक्ष सुनील दळवी यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या. तसेच नूतन मुख्याध्यापक सर्जेराव मांगले यांना पदभार स्वीकारण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक ढेकळे यांनी संस्थेच्या विकास कामांसाठी १,११,१११ रुपयांची देणगी देण्याचे जाहीर केले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम घडशी यांनी केले तर आभार सुप्रिया पवार यांनी मानले.