शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

अंगणवाडी सेविकांना शिकवा ना इंग्लिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST

रहिम दलाल लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांसाठी पोषण ट्रॅकर हे ॲप विकसित केले आहे. या ...

रहिम दलाल

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांसाठी पोषण ट्रॅकर हे ॲप विकसित केले आहे. या ॲपमध्ये अंगणवाडी सेविकांना दररोज माहिती भरणे बंधनकारक आहे. ही सर्व माहिती इंग्रजीमधून भरावी लागत आहे. काही अंगणवाडी सेविकांचे शिक्षण सातवी ते दहावीपर्यंत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना माहिती इंग्रजीतून भरताना अडचणीचे ठरत आहे. रत्नागिरी जिल्हा डोंगराळ असून, अनेक गावांमध्ये मोबाईलवर इंटरनेट सेवा उपलब्ध होत नाही. त्यामुळे या ॲपचा इंटरनेट नसलेल्या ठिकाणच्या अंगणवाड्यांना काहीही उपयोग होत नाही.

पोषण ट्रॅकर ॲपचा वापर कसा करावा, यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. काही अंगणवाडी सेविकांचे शिक्षण कमी असल्याने त्यांना माहिती भरण्यासाठी मराठीतून फॉरमॅट देण्यात आलेला आहे. त्यानुसार ॲपमध्ये माहिती भरण्यासाठी सुपरवायझर मदत करत असतात.

- योगेश जवादे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला बालकल्याण समिती, जिल्हा परिषद.

पोषण ट्रॅकर ॲप हे इंग्रजीमधून आहे. मराठीतून माहिती भरण्यासाठी या ॲपमध्ये तसा बदल करण्यात यावा, अशी मागणी संघटनेकडून आयुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यासाठी संघटनेतर्फे निवेदनही देण्यात आले आहे.

- संगीता आंबेरकर, तालुकाध्यक्ष,

अंगणवाडी कर्मचारी संघटना

पोषण ट्रॅकर ॲपमध्ये इंग्रजीतून माहिती भरता येत नसल्याने मराठी फॉरमॅट देण्यात आलेला आहे. तो अंगणवाडी सेविका भरतात. त्यानंतर महिन्यातून दोनवेळा होणाऱ्या गट बैठकीवेळी त्या फॉरमॅटवरुन सुपरवायझरच्या मदतीने मोबाईलवर ऑनलाईन माहिती भरण्यात येते.

माेबाईलची अडचण वेगळीच

पोषण ट्रॅकर ॲपमध्ये सर्व माहिती इंग्रजीमधून भरावी लागत आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा डोंगराळ असल्याने इंटरनेट सेवा मिळत नाही. अशावेळी खूप अडचणीचे ठरत आहे. तसेच मोबाईलची व्हॅलिडिटी संपलेली आहे. त्यामुळे अनेकदा हा मोबाईल हँग होत असल्याने माहिती भरताना त्रास होता. त्याचबरोबर अनेकदा मोबाईलमध्ये बिघाड होत असल्याने जिल्हा कार्यालयाकडे दुरुस्तीसाठी दिला जातो. आतापर्यंत २४८ मोबाईल नादुरुस्त झाले होते. त्यापैकी ९० टक्के मोबाईल दुरुस्त करण्यात आले. उर्वरित १० टक्के मोबाईल अजूनही दुरुस्त झालेले नाहीत.

पाेषण ट्रॅकवरील कामे

पोषण ट्रॅकरमध्ये नवजात बालकांपासून ते चार वर्षांपर्यंतच्या बालकांची माहिती, गरोदर माता, स्तनदा माता यांची माहिती तसेच त्यांना दिला जाणारा पोषण आहार आदींची माहिती इंग्रजी भाषेत भरावी लागते. ही माहिती भरण्याची पद्धत किचकट व इंग्रजीमधून असल्याने अंगणवाडी सेविका हैराण झाल्या आहेत.