शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करजुवेत टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 14:51 IST

संंगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तातडीने दोन टँकर करजुवे गावात पोहोचल्याने येथील अकरा वाड्यांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.

ठळक मुद्देग्रामस्थांची गैरसोय दूर -- स्रोत आटल्याने तीव्र पाणीटंचाई- अकरा वाड्यांमध्ये ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल

देवरूख : संंगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तातडीने दोन टँकर करजुवे गावात पोहोचल्याने येथील अकरा वाड्यांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.मे महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश गावांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावामध्येही सध्या पाण्याचे स्रोत आटल्याने पाणी समस्या भेडसावू लागली आहे. उन्हामुळे पाण्याची पातळी अतिशय खाली गेली आहे. त्यामुळे गावातील लोकांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत होता.  या गावातील चाफेवाडी, मोरेवाडी, वाकसालवाडी, चांदिवडेवाडी, मावळातली बाचीमवाडी, भोईवाडी, तिसंगवाडी, डावलवाडी, बौद्धवाडी, सुतारवाडी, विचारेकोंड या ११ वाड्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने संगमेश्वरचे तहसीलदार संदीप कदम यांच्याकडे सादर केला होता.काही दिवसांपूर्वीच या गावाच्या दौºयावर आलेले रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या गावात दोन टँकर पोहोचले. या टँकरने चाफेवाडी, मोरेवाडी, चांदिवडेवाडी, बाचिमवाडी या वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला.  यावेळी संगमेश्वरचे पंचायत समिती सदस्य सुभाष नलावडे, माजी उपसभापती संतोष डावल, करजुवेचे सरपंच शामसुंदर माने, उपसरपंच श्रीकांत नलावडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. गावासाठी दोन टँकर मिळाल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, देवरूख तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी धन्यवाद दिले. 

टॅग्स :water transportजलवाहतूकRatnagiriरत्नागिरी