शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भोस्ते घाटात टँकरचा स्फोट

By admin | Updated: August 31, 2014 00:33 IST

चालकाचा मृत्यू : टॅँकर ज्वालाग्राही पदार्थाचा; दरीत कोसळल्याने दुर्घटना

खेड : विषारी रसायन अथवा गॅससदृश ज्वालाग्राही पदार्थाने भरलेला टँकर २०० फूट खोल दरीत कोसळून त्याचा स्फोट झाल्याची घटना काल, शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात घडली. अपघातानंतर टँकरला लागलेल्या भीषण आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. मात्र, त्याचे नाव अद्याप समजू शकले नाही़ दरम्यान, आगीचे वृत्त कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले, प्रांताधिकारी डॉ. जयकृष्ण फड, तहसीलदार प्रकाश संकपाळ, पोलीस निरीक्षक विकास गावडे, लोटे वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी परब घटनास्थळी दाखल झाले. मनसेचे नेते वैभव खेडेकर, नंदू साळवी, युवासेनेचे निकेतन पाटणे, युवक काँग्रेसचे गौस खतिब, अभिनय महाजन, राजन महाकाळ, बाळा पांचाळ, बाळासाहेब सासणे, आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुघर्टनेमुळे गणेशोत्सवाला जाणाऱ्या गणेशभक्तांना आपापल्या घरी पोहोचण्यास विलंब होत होता़ तब्बल एक तासानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. गणेशोत्सव काळात अवजड वाहनांना बंदी असतानाही हा टँकर महामार्गावरून भोस्ते घाटापर्यंत आलाच कसा? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला़स्फोटाच्या दणक्याचे खेड शहरात हादरे४रात्री या टँकरचा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीच्या ज्वाळा तेथून पाच किलोमीटरवरील भोस्ते गावामधील जसनाईक मोहल्ला, पाटीलवाडी, बौद्धवाडी, खाडीपट्ट्यात तसेच खेड शहरातील बाजारपेठ, गुजरआळीपर्यंत दिसत होत्या़ स्फोटाच्या आवाजाच्या दणक्याने घराच्या खिडक्या, दरवाजे यांनाही हादरे बसल्याचे भोस्ते आणि खेडमधील काही नागरिकांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या धामधुमीत गणेशभक्त रात्रभर कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी या आगीच्या ज्वाळा पाहिल्या व घटनास्थळी धाव घेतली होती.४या घटनेची खबर मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलालाही सूचना करण्यात आली. मात्र, नेमक्यावेळी बंंब बंद पडल्याने तो दुर्घटनास्थळी पोेहोचू शकला नाही़ खेड नगरपालिकेचा पाण्याचा टँकर मात्र यावेळी उपयोगी पडला. यामुळे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न लगेच सुरू झाले़ याचवेळी लोटे औद्योगिक वसाहतीमधील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले़