शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्पाचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊन करा : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:40 IST

जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्पाचे काम हे प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच करा, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देरेल्वेलाईनच्या बांधकामाबाबत घेतली माहिती, समस्यांबाबतही केली फुणगूस ग्रामस्थांशी चर्चाभूसंपादनाबाबत स्थानिक आमदारांशी चर्चा करू

रत्नागिरी : जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्पाचे काम हे प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच करा, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या आहेत. जेडीआरएलच्या मालवाहतूक रेल्वे लाईनच्या कामामुळे उद्भवणाऱ्या  समस्यांबाबत आयोजित बैठकीमध्ये देसाईवाडी - फुणगूस येथे ते बोलत होते.

यावेळी जेडीआरएलचे प्रकल्प समन्वयक राजीव लिमये, अमित चौधरी, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. एस. के. थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सावर्डेकर, संगमेश्वरचे तहसीलदार संदीप कदम, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता बी. डी. साळवी, उपअभियंता पाणीपुरवठा बी. आर. शिंदे, प्रकल्प अभियंता पाटणकर, जिल्हा परिषद शाखा अभियंता पी. एस. पोवार, फुणगूसच्या संरपच प्राची भोसले उपस्थित होत्या.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, या रेल्वे प्रकल्पाला गावाचा विरोध नाही. प्रकल्प झाल्याने येथील गावांचा विकास होणार आहे. परंतु, प्रकल्पामुळे येथील ग्रामस्थांना येत असलेल्या समस्या व अडचणीही दूर करणे गरजेचे आहे. मी राज्याच्या उद्योगमंत्र्याबरोबरच फुणगूसचा ग्रामस्थही आहे, त्यामुळे या प्रकल्पामुळे येथील गावांना निर्माण होणाºया समस्या दूर करण्यासाठी कटीबध्द आहे.

पाणीपुरवठ्याविषयी बोलताना देसाई म्हणाले की, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावांना विहीर व सोबत पाणीयोजना देण्यात येणार आहे. त्यामुळे अशी पाणीपुरवठा योजना तयार करा की, ज्यामुळे बाधीत गावातील पाण्याच्या प्रश्न कायमाचा सुटेल. भूसंपादनबाबत बोलताना उद्योगमंत्री म्हणाले की, भूसंपादीत करण्यात येणाऱ्या जमिनीच्या दराबाबत आपण स्थानिक आमदारांसोबत सविस्तर चर्चा करु, असे ते म्हणाले.ग्रामस्थ, अधिकाऱ्यांशी केली चर्चा..यावेळी उद्योगमंत्र्यांनी गावातील सहाण तसेच प्रकल्पाच्या कामात अवजड वाहनांमुळे खराब झालेले रस्ते, पाणीपुरवठा, भूसंपादन याविषयी निर्माण होणाऱ्या अडचणी, समस्यांबाबत गावकरी व अधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली.रस्ते दुरुस्त करा...प्रकल्पाचे काम करताना सहाणेच्या जमिनीला अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रकल्पाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी अवजड वाहनांच्या रहदारीमुळे रस्ते खराब झाले आहेत, ते दुरुस्त करण्याची जबाबदारी संबधित यंत्रणेची आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईRatnagiriरत्नागिरी