शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी रणकंदन?

By admin | Updated: August 15, 2016 00:28 IST

नगराध्यक्ष निवडणूक : सेना, भाजप, राष्ट्रवादीतील दावेदारांना पक्षातूनच आव्हान?

रत्नागिरी : येत्या डिसेंबरमध्ये होत असलेल्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून सध्या सेना व भाजपमध्ये वादळ घोंगावू लागले आहे. उमेदवारीसाठी दावा करणाऱ्यांना त्यांच्याच पक्षातून जोरदार आव्हान दिले जात असल्याने उमेदवारी देण्यावरून रत्नागिरीत रणकंदन माजणार असल्याची चिन्हे आहेत. रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सेनेत तसेच भाजपमध्येही अनेक दावेदार आहेत. भाजपतर्फे विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सेनेतर्फे बंड्या साळवी, तर राष्ट्रवादीतर्फे उमेश शेट्ये यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. असे असले तरी तीनही पक्षांमध्ये यावरून जोरदार धुसफूस सुरू असल्याने आयत्यावेळी तिसऱ्याच कोणाची नावे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, दावेदार असलेल्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक डिसेंबर २०१६मध्ये होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी आरक्षण सोडत होणार काय, याबाबत संभ्रम कायम आहे. सोडत झाल्यास व महिला आरक्षण पडल्यास मात्र अनेकांची आणखीनच गोची होईल, अशी चर्चाही रंगली आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेतर्फे बंड्या साळवी, भय्या मलुष्टे, राहुल पंडित, राजेश सावंत यांची नावे आघाडीवर आहेत. परंतु बंड्या साळवी हे सर्वाधिक आघाडीवरचे नाव आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचा शब्दही वरिष्ठांनी दिल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या विरोधातही दुसरे इच्छुक मोर्चेबांधणी करीत आहेत. सेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवताना जुन्या - नव्यांमध्ये गटबाजी उफाळून येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे भलत्याचाच लाभ होऊ शकतो, अशी चर्चा आहे. युतीत नसलेल्या भाजपमध्येही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून वादळ निर्माण झाले आहे. विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर हे पुन्हा या पदाच्या उमेदवारीसाठी आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. परंतु अडीच वर्षांपूर्वी नगराध्यक्षपदासाठी अशोक मयेकर यांचे नाव निश्चित झालेले असतानाही महेंद्र मयेकर यांनी वेगळा गट करून बंडखोरी केली. त्यावेळी झाकली मूठ सव्वा लाखाची राखण्यासाठी भाजप नेत्यांनी त्यांना सांभाळून घेतले. परंतु पक्षाच्या आदेशाला हरताळ फासल्याचा राग पक्षात महेंद्र मयेकर यांच्यावर आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची उमेदवारी महेंद्र मयेकर यांना देण्यास पक्षातून विरोध असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार काय, असाही प्रश्न आहे. राष्ट्रवादीतून उमेश शेट्येंचे नाव आघाडीवर आहे. मात्र, त्यांच्या पक्षातही त्यांच्याबाबत नाराजी असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. (प्रतिनिधी)