शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

माहिती संकलनासाठी यंत्रणेची धावपळ

By admin | Updated: February 5, 2016 23:42 IST

योजनांचा आढावा : विधान मंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती १०पासून दौऱ्यावर

रत्नागिरी : महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती १० फेब्रुवारीपासून तीन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या कालावधीत अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा, या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांचे नोकरीतील आरक्षण, अनुशेष आदींबाबत ही समिती आढावा घेणार आहे.आमदार डॉ. सूरज खाडे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत लखन मलीक, आमदार हरिष पिंगळे, सुधाकर भालेराव, सुधीर बारव, रमेश बुंदिले, सुभाष साबणे, वर्षा गायकवाड, सुजित मणचेकर, नरहरी झिरवाड, इम्तियाज सय्यद, अ‍ॅड. जयदेव गायकवाड, प्रकाश गजभिये, प्रा. जोगेंद्र कवाडे, विजय उर्फ भाई गिरकर हे सदस्य आहेत. यावेळी समितीच्या उपसचिव मेघना तळेकर, अव्वर सचिव प्रकाशचंद्र खोदले, पक्षाधिकारी दामोदर गायकर आदी अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या तीन दिवसांच्या कालावधीत ही समिती मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे, आश्रमशाळा, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नगरपरिषद आदी ठिकाणी भेट देणार आहे.१० रोजी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह््यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्यासमवेत ही समिती चर्चा करणार आहे. ११ वाजता जिल्हा परिषद सभागृहात कर्मचारी भरती, बढती, आरक्षण याबाबत चर्चा, दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे कर्मचाऱ्यांबरोबर योजनांचा आढावा घेण्यात येईल.११ रोजी जिल्हा परिषदेने मागासवर्गीयांसाठी केलेल्या कामाचा आढावा ही समिती घेणार आहे. तसेच पंचायत समितीलाही भेट देणार आहे. १२ रोजी लोकप्रतिनिधी, पालिका पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक, दुपारी पोलीस मुख्यालयात भरती, बढती, आरक्षण याबाबतचा आढावा समिती घेणार आहे. दौऱ्याची जोरदार तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या विविध योजनांबाबतही समिती माहिती घेणार आहे. (प्रतिनिधी)अनुसूचित जातीच्या योजनांचा आढावाअनुसूचित जाती कल्याणासाठीच्या योजना योग्यप्रकारे राबविण्यात आल्या आहेत का, याची पाहणी ही समिती करणार आहे. यामुळे संबंधित यंत्रणांची धावपळ उडाली असून, राबविलेल्या योजनांची माहिती संकलीत करण्यासाठी संबंधितांची धावपळ उडाली आहे.प्रवर्गातील आरक्षण, अनुशेष आदींबाबतही आढावा.आमदार डॉ. सूरज खाडे यांच्या अध्यक्षतेखालील समिती.जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद,पोलीस अधीक्षक, नगर परिषद, आश्रमशाळा, मागासवर्गीय वसतीगृह आदी ठिकाणांना देणार भेटी.जिल्हा प्रशासनाकडून दौऱ्याची तयारी.