शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीचा सुपुत्र सुपर क्लास वन अधिकारी, डाएटच्या प्राचार्यपदी सुशिल शिवलकर 

By शोभना कांबळे | Updated: January 8, 2024 16:02 IST

रत्नागिरी : शहरातील मांडवीचे सुपुत्र सुशील सुरेश शिवलकर यांची येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) प्राचार्यपदी पदोन्नतीने (गट ...

रत्नागिरी : शहरातील मांडवीचे सुपुत्र सुशील सुरेश शिवलकर यांची येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) प्राचार्यपदी पदोन्नतीने (गट अ राजपत्रित अधिकारी) म्हणून  नियुक्ती झाली आहे. शुक्रवार, दि.५ जानेवारी रोजी त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. डाएटच्या स्थापनेपासून आतापर्यंत  प्रचार्यपदी  पहिल्यांदाच रत्नागिरीचा सुपुत्र विराजमान झाला आहे.सुशिल शिवलकर यांनी मराठी, हिंदी, इतिहास,राज्यशास्त्र या विषयातून एमए केले. त्यांनंतर एम एड, एम फील केले. पत्रकारितेतील पदविकाही संपादन केली. तसेच रत्नागिरीतील शासकीय अध्यापक महाविद्यालय (B.Ed.) येथे इतिहास विषयासाठी मार्गदर्शक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी बी एड वर्गासाठी  इतिहास, मराठी या विषयासाठी तर, एम. ए इतिहास व मराठी या विषयासाठी समुपदेशक म्हणून सेवा केली आहे.त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीला १९९२ साली रत्नागिरी नगर परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सुरुवात झाली. २५ जानेवारी २००६ रोजी एमपीएससी परीक्षेद्वारे त्यांची रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या ठिकाणी अधिव्याखाता (महाराष्ट्रातील शिक्षण सेवा गट ब) या पदावर नियुक्ती झाली. २ फेब्रुवारी २०१३ रोजी पदोन्नतीने याच ठिकाणी  वरिष्ठ अधिव्याख्यात (महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ) या पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते.त्यानंतर आता ३ जानेवारी रोजी प्राचार्य (महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग अ राजपत्रित अधिकारी) म्हणून त्यांना रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत पदोन्नती मिळाली आहे. शुक्रवारी त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला.  यावेळी संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. सुशिल शिवलकर यापूर्वीही दोनवेळा या संस्थेचे प्रभारी प्राचार्य होते.

आपल्या मुलांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे. पण आत्मविश्वासाचा अभाव आणि त्यामुळे स्पर्धा परिक्षांबाबत उदासिनता यामुळे यश मिळत नाही. या मुलांनी आत्मविश्वास? परिश्रम आणि अभ्यासात सातत्य ठेवले, तर यश नक्की मिळेल. - सुशिल शिवलकर, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी