शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यकांत दळवी यांची सेनेतून हाकलपट्टी करणार : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 14:44 IST

दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी खोटे आरोप करत असून, त्यांनी मला बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली असल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत केला आहे. आपण दळवी यांच्याविरोधात १० कोटी रूपयांचा अब्रूनूकसानाचा दावा ठोकणार आहोत. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी पक्षप्रमुखांकडे करणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देसूर्यकांत दळवी यांची सेनेतून हाकलपट्टी करणार : रामदास कदम निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत वातावरण पेटले

दापोली : दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी खोटे आरोप करत असून, त्यांनी मला बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली असल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत केला आहे. आपण दळवी यांच्याविरोधात १० कोटी रूपयांचा अब्रूनूकसानाचा दावा ठोकणार आहोत. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी पक्षप्रमुखांकडे करणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.दोन दिवसांपूर्वी दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना पर्यावरणमंत्री रामदास कदम हे बंगाली बाबांना सोबत घेऊन फिरतात व जादूटोणा करत असल्याचा आरोप केला आहे. आज शिवसेनेच्या दापोली तालुका कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमासाठी रामदास कदम आले असता पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, दळवी यांना रामदास कदम यांची कावीळ झाली असून, दळवींना आता सर्वत्र रामदास कदम दिसू लागले आहेत. मी विरोधी पक्ष नेता असतानाच जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाल्याची दळवी यांना माहिती नसावी. आपण जादूटोणा करत असल्याची आठवण त्यांना २०१९मध्ये झाल्याचे ते म्हणाले.गेल्या चार वर्षात दापोली विधानसभा मतदारसंघात १ हजार २०० कोटींचा निधी आणला असून, दळवी समोर आल्यास हिशेब देऊ. एकीकडे आपल्याला शिवसेनेचा नेता म्हणायचे, तर दुसरीकडे आपल्याविरोधात प्रसारमाध्यमातून बोलायचे, हेच ते करत आहेत असे ते म्हणाले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमRatnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण