शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय समर्थनांमुळे प्रकल्प समर्थकांना पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:44 IST

nanar refinery project Ratnagiri- विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत रिफायनरी समर्थकांनी प्रकल्पाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जोर लावला आहे. आजवर केवळ विरोधच होणाऱ्या कोकणात प्रकल्प होण्यासाठी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, हे चित्र प्रथमच दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत स्थानिक पातळीवर प्रकल्पाचे समर्थक वाढत असताना, आता राजकीय पातळीवरूनही समर्थन वाढू लागल्याने, प्रकल्पाबाबतचे सकारात्मक वातावरण वाढू लागले आहे.

ठळक मुद्देविविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी रिफायनरी प्रकल्प हवा अशी दोन वर्षांपासूनची सकारात्मक मागणी

मनोज मुळ्येरत्नागिरी : विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत रिफायनरी समर्थकांनी प्रकल्पाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जोर लावला आहे. आजवर केवळ विरोधच होणाऱ्या कोकणात प्रकल्प होण्यासाठी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, हे चित्र प्रथमच दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत स्थानिक पातळीवर प्रकल्पाचे समर्थक वाढत असताना, आता राजकीय पातळीवरूनही समर्थन वाढू लागल्याने, प्रकल्पाबाबतचे सकारात्मक वातावरण वाढू लागले आहे.रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी मागणी गेल्या दोन वर्षांत सातत्याने केली जात आहे. ज्या गावांना प्रकल्प नको आहे, ती गावे वगळून उर्वरित गावांचा एक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात समाविष्ट गावांमधील ८० टक्के लोकांची संमतीपत्रे तयार आहेत. त्या लोकांची प्रकल्पासाठी जागा देण्याची तयारी आहे.

स्थानिकांची मागणी हवी, हा मुद्दा मांडतानाच जिल्ह्यातील लोकांचा प्रकल्पाला पाठिंबा हवा, असा मुद्दाही शिवसेनेकडून मांडण्यात आला होता. त्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येत आम्हाला प्रकल्प हवा आहे, अशा घोषणा देत रत्नागिरीत मोर्चाही काढला. मात्र, तरीही प्रकल्पाबाबत कोणतीच प्रगती झाली नाही.लोकांना हवा आहे, एवढ्या एका कारणासाठी प्रकल्प होणार नाही. त्यासाठी ते राजकीय लोकांच्या मनात यायला हवे, राजकीय इच्छाशक्ती दांडगी असायला हवी, हे लक्षात घेऊन गेल्या वर्षापासून रिफायनरी समर्थकांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. जोवर राजाश्रय नाही, तोपर्यंत प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची पावले पडणार नाहीत.

ही बाब लक्षात घेऊन राजकीय गाठीभेटी वाढल्या आहेत. या सर्व भेटींमध्ये राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे अत्यंत स्पष्ट आणि नेमक्या शब्दांत प्रकल्पाबाबत समर्थनाची भूमिका मांडली आहे. बाकी नेत्यांनी आपली भूमिका गोल गोल शब्दात मांडली असली, तरी त्यांनी सकारात्मकता ठेवली आहे. त्यांनी याबाबत पुढील गरजेच्या गोष्टी सुरू केल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीतूनही खूप काही साध्य होत आहे, ही बाब प्रकल्प होण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे प्रकल्प समर्थकांना पाठबळ मिळाले आहे.गतवर्षापासून झालेल्या राजकीय नेत्यांच्या भेटीगतवर्षी जुलै महिन्यात आमदार राजन साळवी, हुस्नबानू खलिफे, ऑगस्ट महिन्यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सप्टेंबर महिन्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नोव्हेंबरमध्ये माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, जानेवारीमध्ये खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, फेब्रुवारी महिन्यात खासदार सुप्रिया सुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, माजी खासदार हुसेन दलवाई आणि मार्च महिन्यात मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे आणि आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी