शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

 अंगणवाड्यांचा रॉकेल पुरवठा थांबणार, पुरवठा विभागाचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 15:52 IST

राजापूर तालुक्यातील अंगणवाड्यांनी गॅस सिलेंडर्सचा वापर करावा यासाठी यापुढे त्यांना रॉकेलचा पुरवठा केला जावू नये, अशा तोंडी सूचना जिल्हा पुरवठा विभागाकडून येथील पुरवठा शाखेला दिल्यामुळे बहुतांशी अंगणवाड्यातील पोषण आहार कसा शिजवायचा असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे .

ठळक मुद्दे अंगणवाड्यांचा रॉकेल पुरवठा थांबणार, पुरवठा विभागाचे आदेश  गॅस सिलेंडर्सचा वापर करण्याची सक्ती

राजापूर : तालुक्यातील अंगणवाड्यांनी गॅस सिलेंडर्सचा वापर करावा यासाठी यापुढे त्यांना रॉकेलचा पुरवठा केला जावू नये, अशा तोंडी सूचना जिल्हा पुरवठा विभागाकडून येथील पुरवठा शाखेला दिल्यामुळे बहुतांशी अंगणवाड्यातील पोषण आहार कसा शिजवायचा असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे .राजापूर तालुक्यात ४०३ अंगणवाड्या असून त्यांना दिलेला पोषण आहार शिजविण्यासाठी पुरवठा विभागाकडून महिन्याला पाच लिटर रॉकेल पुरवले जात होते. यामध्ये दहा ते पंधरा अंगणवाड्यांकडे सिलेंडर्स आहेत. सिलेंडर्सचा वापर अधिक वाढावा यासाठी अंगणवाड्यांना यापुढे रॉकेलचा पुरवठा केला जावू नये, अशा तोंडी सुचना येथील पुरवठा विभागाला आल्याचे सांगण्यात आले.जर अंगणवाड्यांना होणारा रॉकेलचा पुरवठा बंद करण्यात आला तर त्या अंगणवाड्यांनी पोषण आहार कसा शिजवायचा? असा प्रश्न बहुतांशी अंगणवाड्यांपुढे उभा रहाणार आहे. कारण किरकोळ अंगणवाड्या वगळता तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांकडे गॅस सिलेंडर्सची सुविधा नाही व दुसरीकडे पुरवठा विभागाकडून रॉकेल पुरवठा बंद करण्याच्या आलेल्या सूचना त्यामुळे मुलांना पोषण आहार कसा शिजवून द्यायचा, अशी डोकेदुखी अंगणवाड्यांची वाढली आहे.शासनाने अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांचे कुपोषण होवू नये म्हणून पोषण आहार सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्व अंगणवाड्यातून पोषण आहार चांगल्या प्रकारे शिजवून दिला जात होता. मात्र जिल्हा पुरवठा विभागाच्या तोंडी सुचनांमुळे अनेक अंगणवाड्यातील पोषण आहार बंद पडण्याजोगी स्थिती निर्माण झाल्याने शासनाच्या मुळ धोरणालाच तडा गेला आहे, अशी टिका आता होवू लागली आहे.अनेक अंगणवाड्या या डोंगराळ परिसरात असल्याने सिंलेंडर्स कसे घेवून जायचे? अशाही समस्या अंगणवाडी सेविकांसह त्यांच्या सहाय्यकांपुढे निर्माण झाल्या आहेत. पाच लिटरचा रॉकेलचा कॅन कसातरी हातातून नेता येतो. पण अंगणवाडी सेविका सिलेंडर्स कसा घेवुन जाणार? त्यामुळे कदाचित यापुढे अनेक अंगणवाड्यांमधील पोषण आहार बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी