शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नवजात बाळावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात यशस्वी लेझर शस्त्रक्रिया

By शोभना कांबळे | Updated: December 26, 2023 18:38 IST

केवळ ११८० ग्रॅम इतके कमी वजनाचे हे बालक

रत्नागिरी : दापोली येथील खाणीत काम करणाऱ्या उत्तर प्रदेश येथील खाण कामगाराच्या ११८० ग्रॅम इतक्या कमी वजनाच्या नवजात बालकावर येथील जिल्हा रूग्णालयात डाॅ. निकुंज भट यांनी यशस्वी लेझर शस्त्रक्रिया केली. त्यामुळे या बालकाचे भविष्यातील अंधत्व टळले आहे.रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशु देखभाल कक्षात हे बालक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. केवळ ११८० ग्रॅम इतके कमी वजनाचे हे बालक होते. बालकाच्या डोळ्याच्या तपासणी दरम्यान या बालकामध्ये राॅप (Retinopathy Of Prematurity) या आजाराचे निदान झाले. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तत्परतेने या बालकावर उपचार सुरु करण्यात आले.ROP या आजारामध्ये उपचार देण्यास उशीर केल्यास बाळ कायमचे आंधळे होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली बाल नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निकुंज भट यांच्यामार्फत दोन्ही डोळ्यांमध्ये मोफत इंजेक्शन देण्यात आले.पुन्हा तपासणीच्या वेळी या बाळाच्या डोळ्याला लेझर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे समजले. त्वरितच या बालकाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात १९ डिसेंबर रोजी डॉ. निकुंज भट यांच्यामार्फत लेझर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. हे बालक ६९ व्या दिवशी पूर्णपणे बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले या बालकाकरीता केल्या गेलेल्या सर्व चाचण्या, तपासण्या व औषधोपचार हे जिल्हा रूग्णालयामार्फत मोफत करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल