शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

चक्क शेततळ्यात मत्स्य शेती यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 14:51 IST

Ratnagiri, Farmer, fisherman गुहागर अथांग समुद्र किनारा लाभला आहे. येथील खाऱ्या पाण्यातील मच्छी सर्वत्र प्रसिद्ध आहे. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम तेलगडे यांनी आपल्या शेततळ्यामध्ये गोड्या पाण्यात मत्स्य शेती प्रकल्प राबवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून, पंचायत समितीचे उपसभापती सुनील पवार यांनी या प्रकल्पाला भेट देऊन शेतकरी तुकाराम तेलगडे यांचे कौतुक केले.

ठळक मुद्देचक्क शेततळ्यात मत्स्य शेती यशस्वीपाटपन्हाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्याच प्रयोगात यश

मंदार गोयथळेअसगोली : गुहागर अथांग समुद्र किनारा लाभला आहे. येथील खाऱ्या पाण्यातील मच्छी सर्वत्र प्रसिद्ध आहे. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम तेलगडे यांनी आपल्या शेततळ्यामध्ये गोड्या पाण्यात मत्स्य शेती प्रकल्प राबवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून, पंचायत समितीचे उपसभापती सुनील पवार यांनी या प्रकल्पाला भेट देऊन शेतकरी तुकाराम तेलगडे यांचे कौतुक केले.तेलगडे यांनी आपल्या जागेमध्ये कृषी विभागाच्या पुढाकाराने मत्स्यशेती प्रकल्प राबवला आहे. समुद्रातील मासे खाणारे खाद्यप्रेमी मोठ्या प्रमाणात आहेत. तसे गोड्या पाण्यातील माशांना ही एक वेगळीच चव असल्याने त्यांनाही स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

मात्र, मागणीनुसार गोड्या पाण्यातील मासे केवळ नदी - नाले, साठवण तलाव यामध्ये मिळत असल्याने मागणीप्रमाणे पुरवठा होऊ शकत नाही. याचा अभ्यास करून तेलगडे यांनी शासनाच्या शेततळे योजनेतून अनुदान घेऊन आपल्या जागेत शेततळे करून घेतले.शेततळ्यातील पाणी मातीत मुरण्याचा धोका असल्याने पाण्याची बचत करण्यासाठी प्लास्टिकचे आच्छादन केले आहे. त्यामध्ये माशांना आवश्यक असलेले शैवाळयुक्त प्रोटिन्स उपलब्ध केले. सध्या तळ्यात २ हजारहून अधिक मासे आहेत. या माशांना बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. या तळ्याच्या शेजारी त्यांनी अनेक प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे.त्यांच्या या प्रकल्पाला गुहागर पंचायत समितीचे उपसभापती सुनील पवार यांनी नुकतीच भेट देऊन त्यांचे कौतुक केले. आपल्या या प्रकल्पाचा आदर्श तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, असे पवार म्हणाले. या प्रकल्पासाठी तुकाराम तेलगडे यांच्यासह त्यांचे कुटुंब मेहनत घेत आहेत.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी