शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळे समुद्रात बुडताना पुण्याच्या पर्यटकाला वाचविण्यात यश

By मनोज मुळ्ये | Updated: August 31, 2022 18:09 IST

पोहता पोहता खोल समुद्राच्या पाण्यात ओढला जाऊन बुडू लागला. सागररक्षक दलाचे सदस्य शरद अशोक मयेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता रिंग बोये घेऊन समुद्रात उडी घेतली आणि गुलशनला समुद्राबाहेर काढले.

संजय रामाणीगणपतीपुळे : गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथे आलेल्या पुण्यातील एका पर्यटकाला समुद्रात बुडताना वाचवण्यात आले. सागर रक्षक दलाच्या सदस्याने त्याचा जीव वाचवला. गुलशन सुधाकर राठोड (२८) असे या तरुणाचे नाव असून, तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील पानोला (माहुर) येथील असून, सध्या तो पुण्याती चाकण येथे एका कंपनीत काम करतो.गणपतीपुळे येथील सागर रक्षक दलाचा सदस्य शरद उर्फ शेऱ्या मयेकर (रा. मालगुंड- भंडारवाडा) यांच्या धाडसामुळे गुलशनचा जीव वाचला. मयेकर यांना गणपतीपुळे देवस्थानचे कर्मचारी अमेय केदार, मिथुन माने व अन्य कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य मिळाले. गुलशनला गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.पुणे चाकण येथील बेलफी वायरिंग हायर्नेस कंपनीचे एकूण वीस तरुण बुधवारी गणपतीपुळे येथे आले होते. सकाळी ११ वाजता ते गणपतीपुळे येथे दाखल झाले. देवदर्शनानंतर ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गुलशन पोहता पोहता खोल समुद्राच्या पाण्यात ओढला जाऊन बुडू लागला. त्याच्या सहकारी मित्रांनी आरडाओरडा केला. तेव्हा गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने कार्यरत असलेले सागररक्षक दलाचे सदस्य शरद अशोक मयेकर (४१, मालगुंड भंडारवाडा) यांनी क्षणाचाही विलंब न लावता रिंग बोये घेऊन समुद्रात उडी घेतली आणि गुलशनला समुद्राबाहेर काढले.त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला तत्काळ मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय वालिया यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला सुस्थितीत आणले.

धाडसी कामगिरी

बुधवारी गणेश चतुर्थी निमित्त गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या वतीने सागरी जीवरक्षकांना सुट्टी असल्यामुळे गणपतीपुळे ग्रामपंचायतीचा एकही जीवरक्षक नव्हता. मात्र गणपतीपुळे सागररक्षक दलाचा सदस्य शरद मयेकर देदेवदूतासारखे धावून आले. त्याच्या या धाडसाबद्दल जयगड पोलीस ठाण्याच्यावतीने गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्रामध्ये रत्नागिरीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जयगडचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील, कॉन्स्टेबल मधुकर सरगर, प्रशांत लोहळकर, सागर गिरीगोसावी, महिला कॉन्स्टेबल वंदना लाड आदींसह जयगड पोलीस ठाण्याचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिरSea Routeसागरी महामार्गdrowningपाण्यात बुडणे