शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष संसारेंच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे दोन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश

By शोभना कांबळे | Updated: April 24, 2023 19:13 IST

रत्नागिरी : शहरातील हॉटेल मिनारचे मालक सुभाष ऊर्फ नाना संसारे यांचे रविवारी ७२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या ...

रत्नागिरी : शहरातील हॉटेल मिनारचे मालक सुभाष ऊर्फ नाना संसारे यांचे रविवारी ७२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या नेत्रदानासाठी सहमती दर्शविल्याने नाना यांच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे आणखी दोन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होणार आहे. मारुती आळीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून नानांची ओळख होती. मयुरा आइस्क्रीम नावाने त्यांनी आइस्क्रीम फॅक्टरीही सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी हॉटेल मिनारची स्थापना केली. ते अत्यंत मनमिळाऊ आणि मिश्कील स्वभावाचे असल्याने आपल्या या व्यवसायात त्यांनी अनेक माणसे जोडली होती.वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर रत्नागिरीतील हेल्पिंग हॅंडसचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, रत्नागिरीचे कार्यकर्ते श्रीवल्लभ (भैय्या) वणजू यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करून त्यांना नेत्रदानाबाबत विचारले. त्याही परिस्थितीत नानांचे चिरंजीव सुमित आणि कन्या या दोन्ही भावंडानी यासाठी होकार दर्शविला. एवढेच नव्हे तर आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही याबाबत सांगितले. त्यामुळे नानांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.भैय्या वणंजू यांच्या प्रयत्नामुळे आणि संसारे कुटुंबियांच्या सहकार्यामुळे सुभाष तथा नाना संसारे यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी तसेच उपस्थित असलेल्या व्यक्तींनीही डाॅक्टरांच्या परवानगीने नेत्रदान कसे होते, हे पाहिले. त्यामुळे अनेकांच्या मनातील गैरसमज दूर झाले.आपल्या वडिलांच्या नेत्रदानामुळे आणखी दोन व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे, हे फार मोठे कार्य असल्याची प्रतिक्रिया नानांचे सुपूत्र सुमित यांनी यावेळी दिली.

नेत्रदानाबाबत अजुनही असंख्य गैरसमज आहेत. मरणोत्तर नेत्रदानासाठी समाजातून म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. समाजात असंख्य अंध व्यक्ती आहेत. त्यांना नेत्रांची गरज आहे. त्यामुळे समाजात नेत्रज्ञानाबाबत प्रबोधन होण्याची गरज आहे. - श्रीवल्लभ तथा भैय्या वणजू, सामाजिक कार्यकर्ता, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी