शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत कॉपी रोखण्यासाठी कडक तपासणी, दहावी परीक्षा केंद्रांवर पालकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:41 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला दि. १ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कोकण विभागातून ३५ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पहिला पेपर मराठी भाषेचा होता. विद्यार्थ्यांपेक्षा अधिक घालमेल पालकांचीच होत असल्याचे दिसून येत होते.

ठळक मुद्देरत्नागिरीत कॉपी रोखण्यासाठी कडक तपासणीदहावी परीक्षा केंद्रांवर पालकांची झुंबड

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला दि. १ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कोकण विभागातून ३५ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पहिला पेपर मराठी भाषेचा होता. विद्यार्थ्यांपेक्षा अधिक घालमेल पालकांचीच होत असल्याचे दिसून येत होते.परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये व कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, यासाठी परीक्षा केंद्राच्या आवाराबाहेर विद्यार्थ्यांच्या सॅक, बॅग्ज् ठेवण्यात आल्या होत्या. पारदर्शक पॅड, कंपास बॉक्स, रिसीट तपासणी करूनच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वर्गात सोडण्यात येत होते.

परीक्षा केंद्रावर सकाळपासूनच लगबग सुरू होती. ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आली आहेत, त्या शाळांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. नियमित वेळेत बदल करून दुपारच्या सत्रात या शाळा भरविण्यात येणार आहेत.कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथके तैनात असून, एका महिला विशेष भरारी पथकाचाही समावेश करण्यात आला आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी प्रथमच कृतिपत्रिका पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे.दहावीच्या परीक्षा दि. २२ मार्चला संपणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ४०३ शाळांमधील २३,८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२५ शाळांमधील ११,४५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दोन्ही जिल्ह्यातील ६२८ शाळांमधून ३५ हजार ३०७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

कोकण विभागात ११४ केंद्र असून, यातील रत्नागिरीमध्ये ७३, तर सिंधुदुर्गमध्ये ४१ केंद्र आहेत. २२ परीरक्षक केंद्र असून, यामध्ये रत्नागिरीमध्ये १३ केंद्र, तर सिंधुदुर्गमध्ये ९ परीरक्षक केंद्र आहेत. हजेरी पूर्ण न भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठी प्रवेशच रद्द करण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ५८ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. कोकण विभागातील ३५९ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांना मान्यता देऊन त्यांना लेखनिक उपलब्ध करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

टॅग्स :examपरीक्षाRatnagiriरत्नागिरी