शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

थांबव, तुझा हा प्रलय मित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST

कोरोना /covid 19 यास, सस्नेह प्रणाम. तुला थोडं आश्चर्य वाटेल; पण होय ! समस्त मानवजातीची प्रतिनिधी म्हणून मी आज ...

कोरोना /covid 19

यास,

सस्नेह प्रणाम.

तुला थोडं आश्चर्य वाटेल; पण होय ! समस्त मानवजातीची प्रतिनिधी म्हणून मी आज तुझ्याशी पत्राद्वारे संवाद साधणार आहे. अरे बाबा! काय चाललंय काय तुझं? जिकडे पहावं तिकडे तुझाच बोलबाला सुरू आहे. गेली दोन वर्षे मोबाइल, फेसबुक, रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्रे या सगळ्या प्रसारमाध्यमांतून तुझीच चर्चा चालू आहे. लहानापासून वृद्धापर्यंत सर्वांच्या तोंडी तुझाच विषय...

एकविसाव्या शतकात महासत्तेकडे वाटचाल करणारे आम्ही आज तुझ्यापुढे हतबल झालो. मोठ्या वैज्ञानिक क्रांतीचे आम्ही उद्गगाते, तुझ्यापायी हकनाक मारले जातोय. प्रगतीसाठी, विकासासाठी चाललेली धावपळ-धडपड जिथल्या तिथे थांबलीय ते फक्त तुझ्यामुळे. असं का घडलं? याचे पुढे दुष्परिणाम काय? या विचार चक्राने खरोखरच माझी मती कुंठित झालीय. कोरोना! तू तर अख्ख्या जगाला घरात कोंडून ठेवलंस. आई घरात, बाबा घरात, मुलं घरात. कोणाला बाहेर जाता येत नाही. कुणाला बाहेरून आत येता येत नाही. ही घर बंद परिस्थिती आता

जगात जवळपास प्रत्येक देशात आहे. तुझ्या या महामारीपुढे विकसित आणि प्रगतिशील म्हणणाऱ्या देशाने सुद्धा गुडघे टेकले आहेत. एवढासा विषाणू या विश्वाची उलथापालथ करू शकतो? याचे राहून राहून मला आश्चर्य वाटतंय. याआधी अनेक जीवाणू-विषाणूंशी आम्ही टक्कर दिली रे ! काही आमचे मित्रही बनले, काहींना तर आम्ही यमसदनी पाठवलं; पण तुझ्यासारखा विषाणू मात्र आम्हाला शेवटची घटका मोजायला लावतोय, म्हणजे काय? थांबव, तुझा हा प्रलय मित्रा? बस्स झालं आता! तुझ्या महामारीपुढे निष्पाप निरपराध लोकांचे विनाकारण बळी जाताना पाहून मनाला खूप त्रास होतोय रे ! तुझा हा कहर आवर आणि माझ्या विश्वाला सावर रे बाबा ! आमची चूक आम्हाला कळली. आम्ही चुकलो, आम्ही अपराधी आहोत, आम्हाला माफ कर. तुझ्यामुळे घरात बसून आमच्या भूतकाळात जेव्हा आम्ही डोकावलो, तेव्हा आम्ही

केलेल्या अमानुष कृत्याची लाज वाटायला लागली आम्हाला ! खरंच आम्ही चुकलो. तू आज आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणलीस; पण कधीकाळी आम्ही मिळवलेले स्वातंत्र्य कधी स्वैराचारात बदलले हेच आम्हाला कळलं नाही.

आम्ही परकीयांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झालो खरे! लोकशाही राज्यात स्वतःच्या मनाचे राजे झालो. अहंकार, अभिमान, आसक्तीची मुळाक्षरे गिरवत आम्ही ज्ञानी झालो. आम्ही आमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. विकासाच्या वाटा तयार केल्या. कधीकाळी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे

वनचरे’ म्हणणारे आम्ही. आमच्या याच निसर्गमित्राचा गळा कापून सिमेंट काँक्रिटची जंगले उभारण्यात दंग झालो़ मोबाइल, टीव्ही, संगणक आमचे मित्र बनले. या निर्जीव यंत्राशी गप्पा मारता मारता आमच्या कुटुंबातला संवादच संपला. प्रत्येक पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचाराचा कली शिरला आणि इथला सच्चेपणा हा हा म्हणता गिळंकृत केला. आज जग एका भयानक विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन थांबले, आज तुझा हा विनाश आम्हाला चांगलाच धडा शिकवून गेला. तुझ्या या महामारीच्या अनुभवाने आमचे चांगलेच डोळे उघडलेस तू... लॉकडाऊनच्या निमित्ताने आम्ही घराघरात बंदिस्त झालो; पण आमच्या मनाची कवाडे उघडून आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करायला लावलेस तू आम्हाला!

कशासाठी मी एवढी धावाधाव करत होतो? का जिवाचा आटापिटा करून घेत होतो? या मृगजळाच्या पाठी धावणारे आम्ही.. आम्हाला कळून चुकले की, हे सगळे मिथ्या आहे. सत्ता, संपत्ती, सौंदर्य या गोष्टी तर तुझ्यापुढे कुचकामी ठरल्या. पैशाच्या पाठीमागे धावणारे आम्ही आज आमचा जीव वाचवण्यासाठी धडपडू लागलोय; पण खरं सांगू मित्रा !तू एकीकडे आमच्यावर एवढी भयावह आपत्ती आणलीस आणि दुसरीकडे ज्याच्यावर आम्ही आतापर्यंत अमानुष अत्याचार केले़ त्या निसर्गाला मात्र आमच्या विळख्यातून मुक्त केलंस. लॉकडाऊनमुळे आज वाहने व कंपनीची चाके बंद असल्यामुळे देशभरातील मोठ्या औद्योगिक शहरांमध्ये प्रदूषण स्तर कमालीचा घटला आहे.

अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, व्यापारी लोकांमुळे देश चालतो; पण तुझ्या लॉकडाऊनने आम्हाला कळून चुकलं की, शेतात नांगर चालतो तेव्हाच देश चालतो. आजच्या घडीला मंदिर, मशीद, चर्च जरी बंद झाले तरी डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कामगाराच्या रूपात देव आमचे रक्षण करत आहे रे ‘न भूतो न भविष्यति’ असा अभूतपूर्व बदल तुझ्यामुळे झाला. चंद्र आणि मंगळावर जीवन शोधणारे आम्ही पृथ्वीवर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडू लागलोय. प्रयत्न करत आहोत आमच्या पाऊलखुणा जपण्यासाठी!!

कोरोना ! खरंच तू आज आमच्या समस्त मानवजातीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहेस. पृथ्वी, आप, तेज, वायू, जल या पांडवरूपी पंचमहाभूतांवर आम्ही कौरवासारखा अत्याचार केला. हा ‘निसर्ग माझा रक्षक आहे’, हेच मुळी आम्ही विसरून गेलो; पण आज या पत्रातून मी तुला असे वचन देते की, मी या निसर्गावर माझी हुकमत गाजवणार नाही. ‘जीवो जीवस्य जीवनम’ या मूलमंत्राने जीवसृष्टीची मी जोपासना करेन. तू हे जे ब्रह्मास्त्र आज आमच्यावर सोडले आहेस, त्याचाही सामना आम्ही संयमानेच देणार आहोत. घरी राहूनच तुझ्याशी आम्ही लढा देत आहोत.

बरं मित्रा ! माझा हा पत्रप्रपंच आता मी थांबवते. तुझाही प्रलय आता तू थांबवून आम्हाला

आमच्या चुकीचे परिमार्जन करण्याची संधी दे. तुला शेवटी मी एवढेच सांगेन..

‘तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना, विश्वास दे,

जे सत्य, सुंदर सर्वदा आजन्म त्याचा ध्यास दे’

तुझीच एक

हितचिंतक..

सविता सर्जेराव पाटील

लांजा