शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दगड कोसळून महिलेचा मृत्यू

By admin | Updated: October 30, 2014 00:46 IST

महिला कऱ्हाडची : आंबोली धबधब्यातील घटना

सावंतवाडी : अंबोली येथील मुख्य धबधब्यावर नातेवाइकांसह पर्यटनासाठी आलेल्या कऱ्हाड येथील क्रांती सतीश दोडगे (वय ३५) यांच्या डोक्यावर दगड कोसळल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना तत्काळ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डोक्यावरील खोल जखमेतून अतिरक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. अंबोलीत सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. आज, बुधवारी सायंकाळी डोक्यावर दगड कोसळून जखमी झालेल्या पर्यटक महिलेच्या मृत्यूमुळे अंबोली येथील पर्यटनातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कऱ्हाड येथील क्रांती दोडगे यांच्यासह अकराजण आज, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तवेरा गाडीने अंबोली व गोवा येथे पर्यटनासाठी आले होते. अंबोली येथील अन्य पर्यटनस्थळे फिरल्यानंतर ते सारेजण सायंकाळी चारच्या सुमारास अंबोली मुख्य धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी पोहोचले. परतीच्या पावसामुळे येथील धबधब्यामध्ये अजूनही पाण्याचा प्रवाह मुबलक आहे. क्रांती दोडगे यांच्यासह सर्वजण मुख्य धबधब्यावर आनंद लुटत असताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर धबधब्यातील एक दगड त्यांच्या डोक्यावर कोसळला. यामुळे त्यांच्या डोक्यात खोलवर जखम झाली आणि रक्तस्राव होऊ लागला. त्यांच्यासोबत असलेले अशोक गायकवाड, सुनीता गायकवाड, विश्रांती लोखंडे, कविता गायकवाड, प्रशांत गायकवाड, श्रेया लोखंडे, संस्कृती लोखंडे यांच्यासह आंबोलीतील स्थानिकांनी त्यांना तत्काळ तवेरा गाडीतून सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. क्रांती यांचे पती पुणे येथे रिक्षा व्यवसाय करतात. सध्या क्रांती बहिणीसोबत कऱ्हाड येथे राहायला होत्या. आज सकाळी त्या बहीण, मावशी, मावस भाऊ आणि अन्य नातेवाइकांसह अंबोली येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. अंबोली पर्यटनातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरअंबोली येथे लाखो पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे. येथील रेलिंग, रस्त्याच्या बाजूच्या दरडींवर व धबधब्यांवर जाळी बसविण्याची मागणी वेळोवेळी करण्यात येते; परंतु प्रशासनाकडून अद्यापही याकडे दुर्लक्षच करण्यात येत आहे. अशा घटनांनंतर तरी पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.