शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

उपरकर शूटिंग रेंजच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निवड

By admin | Updated: December 5, 2014 23:19 IST

विभागीय स्पर्धा : दहा मीटर ओपन साईट एअर रायफल, एअर पिस्तूल प्रकारात यश

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे व कोल्हापूर क्रीडा कार्यालयाच्या विद्यमाने नुकत्याच कोल्हापूर येथील दुधाळी शूटिंग रेंज येथे घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्गच्या उपरकर शूटिंग रेंजच्या विद्यार्थ्यांनी १० मीटर ओपन साईट एअर रायफल व एअर पिस्तुल या क्रीडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी केली. या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील स्पर्धकांचा सहभाग होता. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी येथील उपरकर शूटिंग रेंजवर सराव करणाऱ्या १५ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात १४ वर्षाखालील मुलींच्या १० मी. ओपन साईट प्रकारात समृद्धी बागवे (आर.पी.डी. हायस्कूल सावंतवाडी) हिने ४०० पैकी २७५ गुण मिळवून प्रथम क्रमांक तर मुलांच्या गटात धनराज सागर भोसले (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी) २७० गुणांसह प्रथम व वेदांत महेंद्र रांगणेकर (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी) याने २५५ गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. १७ वर्षाखालील गटात मुलांमध्ये वल्लभ श्रीकृष्ण सावंत (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी) २८६ गुण मिळवत द्वितीय तर विराज मेस्त्री(सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी) २८४ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात सिद्धाली श्रीकृष्ण वारंग (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी) तर तनया रामचंद्र वाडकर (कळसूलकर स्कूल सावंतवाडी) २७५ गुण मिळवून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला.१९ वर्षाखालील मुलांच्या गटात शिवम दीपक सावंत (सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी) याने २४७ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तर मुलींमध्ये युक्ता प्रमोद सावंत(मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी)हिने २७० गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. १० मी. एअर पिस्तुल श्रावणी श्रीकृष्ण पुनाळेकर (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी) ४०० पैकी ३३४ गुणांची नोंद करत तृतीय क्रमांक मिळविला. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेले निमीश पटेकर, धार्मिक खोबरेकर, यशोधन चव्हाण, यश नवांगुळ, प्रतिक्षा सावंत यांनी चांगली कामगिरी केली. या सर्व खेळाडूंना उपरकर शूटिंग रेंजचे प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्व विजेत्या खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम मांगले, सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंंग असोसिएशन सावंतवाडी, उपरकर शूटिंंग रेंज क्रीडा कार्यालय ओरोस यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. (वार्ताहर)