शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत २६, २७ रोजी राज्यस्तरीय वेटरन्स टेबल टेनिस स्पर्धा

By मेहरून नाकाडे | Updated: January 25, 2024 15:48 IST

टेबल टेनिस हा जगातील दोन क्रमांकाचा फास्टेस्ट खेळ

रत्नागिरी : रत्नागिरीत प्रथमच राज्यस्तरीय वेटरन्स (दिग्गज) टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन एसएएस स्पोर्ट्स यांनी २६ व २७ जानेवारी रोजी केले आहे. उद्यमनगर येथील नाईक हॉल येथे या स्पर्धा होणार असून राज्यभरातून १५० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतून राज्याच्या संघाची निवड केली जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. २७ जानेवारीला रत्नसिंधू योजनेचे कार्यकारी संचालक व उद्योजक किरण तथा भैय्या सामंत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वेटरन्स टेबल टेनिस कमिटी, रत्नागिरी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आणि ओम साई स्पोर्टस् अॅकॅडमीचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. शिल्पा जोशी, श्रुती कानडे-जोशी व आशा चव्हाण यांच्या एसएएस स्पोर्ट्सतर्फे दरवर्षी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदा प्रथमच रत्नागिरीत ही स्पर्धा होणार असून पुढील काही वर्षे अशी स्पर्धा घेण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.या स्पर्धेत महिला व पुरुष एकेरीमध्ये ३९, ४९, ५९, ६९, ७४ वर्षावरील वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. तसेच स्मार्ट ग्रुप, क्लेव्हर ग्रुप या ३९ व ४९ आणि ५९ वर्षावरील वयोगटासाठी ग्रुपच्या स्पर्धाही यात होणार आहेत. ७५ वर्षावरीलही ६ स्पर्धक यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा आस्वाद रत्नागिरीतील शालेय खेळाडूंनीही घ्यावा. कारण अनेकदा मोठ्या स्पर्धा मुंबई, पुण्यात होत असतात.टेबल टेनिस हा जगातील दोन क्रमांकाचा फास्टेस्ट खेळ आहे. टेबल टेनिस खेळायची मज्जा मुलांना येते. या स्पर्धेकरिता आनंद जोशी यांचे बहुमोल सहकार्य लाभल्याची माहिती शिल्पा जोशी यांनी दिली. यापूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पदक प्राप्त करून देणाऱ्या १४ खेळाडूंचा सन्मान या स्पर्धेनिमित्त करण्यात येणार आहे. जूनमध्ये ११ ते १९ वयोगटातील मुलांसाठीही स्पर्धा रत्नागिरीत आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी