शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी फेऱ्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

देवरूख : येथील आगारातून ग्रामीण भागात सोडण्यात येणाऱ्या एस.टी. फेऱ्या अचानक बंद करण्यात आल्या आहेत. साखरपा, संगमेश्वर, रत्नागिरी मार्गावरील ...

देवरूख : येथील आगारातून ग्रामीण भागात सोडण्यात येणाऱ्या एस.टी. फेऱ्या अचानक बंद करण्यात आल्या आहेत. साखरपा, संगमेश्वर, रत्नागिरी मार्गावरील फेऱ्या केवळ अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सुरू आहेत. सध्या शेतीची कामे असल्याने प्रवासी भारमान वाढले आहे. मात्र अचानक एस. टी. फेऱ्या बंद केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

खताचा साठा उपलब्ध

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला १०,७२८ मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फ त शेतकरी बागायतदार, सर्वसामान्यांच्या मागणीनुसार खतवाटपाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात कृषी विभागाने ४,५०० मेट्रिक टन खत वाटप केले आहे.

स्वराज्य संघटनेचे श्रमदान

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कडवई, तुरळ रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. अखेर नागरिकांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन स्वराज्य संघटनेच्या पदाधिकारी आणि सभासदांनी दिवसभर श्रमदान करून या रस्त्यावरील चिखल दूर केला आहे.

छप्पर नादुरुस्त

रत्नागिरी : शहरानजीकच्या ग्रुप ग्रामपंचायत काळबादेवीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या आरे गावातील अंगणवाडी इमारतीचे छप्पर नादुरुस्त झाले आहे. यामुळे बालकांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे या ग्रुप ग्रामपंचायतीने वारंवार पत्रव्यवहार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.

ऑक्सिमीटरचे वाटप

लांजा : येथील मुस्लीम वेल्फेअर सोसायटीतर्फे आरोग्य यंत्रणेसाठी ऑक्सिमीटर भेटदाखल देण्यात आले आहे. सोसायटीतर्फे कार्याध्यक्ष अकिल नाईक, सचिव राजू नाईक, नासिर मुजावर, मोहसीन वाडेकर, हसन मुजावर आणि फकीर सारंग यांच्या उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी मारुती कोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

परीक्षा लांबणीवर

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षाही अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर गेल्या आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता या शिष्यवृत्ती परीक्षाही रद्द झाल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

मार्गावरील चर धोकादायक

देवरूख : देवरूख, संगमेश्वर या मार्गावरील रस्त्याचे काम नव्याने करण्यात आले आहे. काम पूर्ण झाले असून, रस्ताही चांगला झाला आहे. परंतु या मार्गावर साडवलीनजीक पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. यामुळे हा रस्ता खणला आहे. या पडलेल्या चरामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी गावात कृषी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कृषी सहायक निशीगंधा डांगे यांनी फळपीक लागवड आणि भातलागवड याविषयी माहिती दिली. कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात खालची गुरववाडी येथील शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

दाखल्यांसाठी प्रतीक्षा

गुहागर : विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. त्यामुळे प्रवेशासाठी तसेच अन्य शैक्षणिक कामकाजासाठी जातीचे, उत्पन्नाचे तसेच अन्य दाखले यांची गरज भासू लागली आहे. परंतु तालुक्यातील महा ई-सेवा केंद्रे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. गैरसोय लक्षात घेऊन सेतू कार्यालय सुरू करण्याची मागणी होत आहे.

पेन्शनधारक वंचित

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील सुमारे ७ हजार पेन्शनधारकांना गेल्या दोन महिन्यापासून पेन्शन मिळाली नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक गैरसोय झाली आहे. या लाभार्थ्यांना अद्याप शासनाकडून निधीच उपलब्ध न झाल्याने त्यांच्या खात्यावरती पेन्शनची रक्कम जमा झालेली नाही.