चिपळूण : भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद गट, कोकरे आयोजित मर्यादित षटकांच्या ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन २४ रोजी ९ वाजता भाजपाचे युवा नेते माधव गवळी यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी गवळी यांनी भविष्यात अद्ययावत क्रीडा संकुल बांधणार असल्याचे प्रतिपादन केले. क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोकणातील गुणी खेळाडू उत्सुक असून, त्यांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक असल्याचे गवळी यांनी सांगितले. क्रीडा क्षेत्रामध्ये विकासासाठी तरुणांचे संघटन होणे आवश्यक असून, त्यांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे सांगितले. क्रीडा क्षेत्रात तरुणांनी भरीव कामगिरी करावी म्हणून महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या विविध योजना कार्यान्वित आहेत. त्यांचा क्रीडा मंडळांनी व युवावर्गाने लाभ घ्यावा, असे आवाहन गवळी यांनी केले. श्री भैरी भवानी क्रीडा मंडळ, येगाव व कोकरे गटातील क्रीडाप्रेमींनी स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. भाजपाचे युवा नेते गवळी यांच्याकडे युवावर्ग ओढला जात आहे. गवळी स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देत असल्याचे मत कोकरे गटाच्या प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकर्ते संतोष गायकवाड, प्रवीण गायकवाड, महेंद्र कदम, मारुती होडे, विकास चव्हाण, मनोहर साळुंखे, विशाल चव्हाण, नीलेश घाणेकर, सिध्दार्थ कदम, आत्माराम कांबळे, प्रकाश बेर्डे, दिलीप जाधव, रत्नदीप चव्हाण, शिवाजी गायकवाड, अंकुश मोहिते, अवधूत सावंत, नारायण चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार महेंद्र कदम यांनी मानले. (प्रतिनिधी)
क्रीडा संकुल उभारणार : गवळी
By admin | Updated: January 28, 2015 00:52 IST