शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश हत्या रोखण्यासाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 17:32 IST

गोवंश हत्या व विनापरवाना जनावरांची वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी अतिरिक्त २५ पोलिसांची तुकडी नेमण्यात आली आहे. शिवाय १० ठिकाणी नव्याने चौकी तयार केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देगोवंश हत्या रोखण्यासाठी विशेष मोहीमअतिरिक्त २५ पोलिसांची तुकडी

चिपळूण : गोवंश हत्या व विनापरवाना जनावरांची वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी अतिरिक्त २५ पोलिसांची तुकडी नेमण्यात आली आहे. शिवाय १० ठिकाणी नव्याने चौकी तयार केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.तालुक्यातील कामथे व पिंपळी येथे घडलेल्या गोवंश हत्येच्या पार्श्वभूमीवर डॉ. मुंढे बोलत होते. ते म्हणाले की, या घटनांविषयी पोलीस यंत्रणेकडून गांभीर्याने तपास केला जात आहे. या प्रकरणामध्ये जुने-नवे कोण आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

तत्पूर्वी अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी १० ठिकाणी नव्याने नाकाबंदी केली जाणार असून, २५ अतिरिक्त पोलीस कर्मचारी त्यासाठी नेमण्यात आले आहेत. नियमित मार्गाबरोबरच आडमार्गावरही आता लक्ष ठेवले जाणार आहे. पुन्हा अशा गोष्टी होणार नाहीत, यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे.सावर्डे येथील जनावरांच्या विनापरवाना वाहतूकप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. ही गाडी नेमकी आली कोठून व ती पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास का आली नाही, याची कारणे शोधली जातील. याविषयी नागरिकांचीही तितकीच जबाबदारी असून, सीसीटीव्हीबाबत नागरिकांचे सहकार्यही महत्त्वाचे आहे.

काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास किंवा इमारत व घरावर सीसीटीव्हीची सुविधा उभारताना रस्ता दिसेल, अशी रचना करणे आवश्यक आहे, जेणेकरून पोलिसांच्या तपासात मदत होईल व सामाजिक सुरक्षा राखली जाईल. त्यासाठी काही सामाजिक संस्थांना सीसीटीव्ही कॅमेरे देण्याचे आवाहन केले जाणार असल्याचेही डॉ. मुंढे यांनी सांगितले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व सावर्डेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांच्यासह सनातनचे हेमंत चाळके, भाजपचे रामदास राणे, माजी सभापती शौकत मुकादम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, पूर्व विभाग संघर्ष समितीचे प्रताप शिंदे, नगरसेवक शशिकांत मोदी, माजी नगरसेवक रतन पवार, मेजर सुरेश शिंदे, मनोज जाधव, प्रशांत परब आदी उपस्थित होते.तातडीची बैठकगोवंश हत्येच्या पार्श्वभूमीवर येथील काही सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या सर्व संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची डॉ. मुंढे यांनी पोलीस स्थानकात तातडीची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी