रत्नागिरी : रत्नागिरी हॅंडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन व जमातुल मुस्लीमीन वाघिवरे यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळुणातील महापुरात सापडलेल्या दिव्यांग बांधवांसाठी मदत करण्यात आली.
पूरग्रस्त अनेक दिव्यांग मदतीपासून वंचित होते. अनेकांच्या घरातील पुरामुळे घरगुती उपकरणे खराब झाली आहेत. दिव्यांग गरजूंची यादी मागविण्यात येऊन जमातुल मुस्लीमीन वाघिवरेतर्फे गरजूंना गॅस शेगडी, मिक्सर, स्टोव्ह यासारखी महत्त्वपूर्ण साधने उपलब्ध करून गरजूंपर्यंत प्रत्यक्ष देण्यात आली.
यावेळी संस्थेचे सदस्य मकबूल साबळे, उपसरपंच फैसल साबळे, आशिक साबळे, अश्फाक साबळे, शकील पेवेकर, नूर मोहम्मद साबळे, इखलास साबळे, हशम साबळे, रफीक झोंबारकर, इकबाल अन्वर, तन्वीर झोंबारकर उपस्थित होते. जमातुल मुस्लीमीन संस्थेने केलेल्या मदतीबद्दल आरएचपी फाउंडेशनचे संस्थापक संचालक सादिक नाकाडे यांनी आभार मानले.