शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खवल्या मांजराची तस्करी; तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 16:25 IST

Crimenews ForestDepartment Ratnagiri- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मौजे भोगाव खुर्द (ता. पोलादपूर) येथे वन विभागाने धडक कारवाई करत खवले मांजरासह तिघांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही चिपळुणातील असून, त्यात एका रिक्षा व्यावसायिकाचाही समावेश आहे.

ठळक मुद्देखवल्या मांजराची तस्करी; तिघे ताब्यातभारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मौजे भोगाव खुर्द (ता. पोलादपूर) येथे वन विभागाने धडक कारवाई करत खवले मांजरासह तिघांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही चिपळुणातील असून, त्यात एका रिक्षा व्यावसायिकाचाही समावेश आहे.रोहा येथील सहायक वनसंरक्षक विश्वजित जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून वनरक्षक अजिंक्य कदम, मंगेश पव्हरे, योगेश देशमुख, वाहन चालक राजेश लोखंडे आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. खवल्या मांजर मादी एका पिलासह पोत्यात भरून (एमएच ०८, एक्यू ४४४१) या रिक्षातून वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार मौजे भोगाव खुर्द येथे ही रिक्षा आल्यानंतर त्या रिक्षाची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये विक्रीसाठी नेण्यात येणारे खवले मांजर आढळले.या कारवाईत रिक्षाचे मालक व चालक नरेश प्रकाश कदम (रा. कालुस्ते, ता. चिपळूण), सागर श्रीकृष्ण शिर्के (रा. चिवेली, ता. चिपळूण), सिकंदर भाई साबळे (रा. वाघिवडे, ता. चिपळूण) यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्हेकामी महाड वनपरिक्षेत्रातील वनरक्षक शरद धायगुडे, संदीप परदेशी, रोहिदास पाटील, प्रकाश पवार, गौतम इहावळे, जंगम मेजर, मच्छिंद्र देवरे, प्रकाश जाधव, नवनाथ मेटकरी यांनी योग्य ती मदत केली. या प्रकरणाचा पुढील तपास रोहा येथील सहायक वनसंरक्षक करीत आहेत. गेले काही महिने हे प्रकार थोडे थांबले होते. मात्र आता ते पुन्हा सुरू झाले आहेत.

टॅग्स :Chiplunचिपळुणforest departmentवनविभागRatnagiriरत्नागिरी