शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

शीव, वाशिष्ठी नद्या घेणार मोकळा श्वास

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

पुराच्या पाण्याचा धोका होणार कमी

चिपळूण : जलसंपदा विभागाच्या पाखरण कार्यक्रमाअंतर्गत चिपळूण शहरातील शीव व वाशिष्ठी नद्यांतील गाळ काढण्याचे नियोजन झाले आहे. दोन्ही नद्यांतील गाळ काढल्यामुळे शहरातील पुराच्या पाण्याचा धोका कमी होईल, अशी माहिती माजी आमदार रमेश कदम यांनी आज (रविवारी) पत्रकारांशी बोलताना दिली.राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे या दोन्ही नद्यांतील गाळ कायमस्वरुपी काढण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांसह नगर परिषद प्रशासनाने सातत्याने शासनाकडे केली होती. त्यानुसार नगर परिषदेने विविध ठरावांद्वारे पत्रव्यवहार केला. या गोष्टीचा आपण पाठपुरावा केल्यामुळे शीव व वाशिष्ठी नद्या गाळमुक्त करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने पावली उचलली आहेत. परिणामी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरात येणारा गाळ काढल्यामुळे पुराचे संकट काहीअंशी कमी होणार आहे. भविष्यात हे शहर पूर्णपणे पूरमुक्त होईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. सन २००५मध्ये आलेल्या महापुरामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन्ही नद्या गाळाने भरल्यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरात पाणी शिरण्याचा धोका संभवतो. २००५ नंतर वाशिष्ठीतील गाळ उपसा काही प्रमाणात झाला. त्याचप्रमाणे नगर परिषदेने स्वनिधीतून शीव नदीतील गाळ काढण्याचे काम गेली ७ ते ८ वर्षे केले. मात्र, याला मोठा खर्च येत असल्याने शासनाकडून गाळ काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्याला यश आले आहे. जलसंपदा विभागातर्फे साखरण कार्यक्रमाअंतर्गत या दोन्ही नद्यांतील संपूर्ण गाळ अलोरे अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या खर्चातून काढला जाणार आहे, असे कदम यांनी सांगितले.अंदाजे १२० स. घ. मी. गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी अंदाजपत्रक, रेखाचित्र व निधी आदींचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश पत्रान्वये देण्यात आले आहेत. पोफळी कोंडफणसवणे पुलानजीकच्या मोरीचे विस्थापीकरण व पर्जन्य उपादान योजनेच्या आयोगाच्या वरील भागातील नदीपात्रातील गाळ काढणे आदी कामांचा तातडीने या कामात समावेश केला असल्याने आता लवकरच चिपळूण शहर पूरमुक्त होऊन दोन्ही नद्या गाळमुक्त होणार आहेत. धोकादायक पूररेषाही संपुष्टात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)प्राधान्याने करणार काम२००५ नंतर शासनाच्या माध्यमातून पूररेषा आखण्यात आली. या पूररेषेमुळे शहरातील बांधकामावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे पूररेषेत येणाऱ्या बांधकामांना परवानगी मिळणे अशक्य झाले होते. शहराची भौगोलिक रचना पाहता शहर खोलगट भागात वसल्याने शहर परिसरातील नगर परिषद व ग्रामपंचायत हद्दीत पूररेषेमध्ये बांधकाम करता येत नव्हते. शहराचा वाढता विस्तार व वाढती नागरी वस्ती लक्षात घेता शहर पूररेषा व पूरमुक्त करण्यासाठी दोन्ही नद्यांमधील गाळ काढणे गरजेचे होते. गाळ काढण्याचे काम प्राधान्याने केले जाणार आहे, असे रमेश कदम यांनी सांगितले.