शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : एस्. टी. कर्मचाºयांच्या संपामुळे एस़् टी़ महामंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. हा संप अद्यापही मिटला नसल्याने तिसºया दिवशीही ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल झाले. महामंडळाच्या बसेस उपलब्ध हात नसल्याने खासगी वाहतुकीने घर गाठावे लागत आहे़ शिवाय ग्रामीण भागातील अनेकांना सणासुदीच्या दिवसांतही घरातून इतर गावांना जाता येत ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : एस्. टी. कर्मचाºयांच्या संपामुळे एस़् टी़ महामंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. हा संप अद्यापही मिटला नसल्याने तिसºया दिवशीही ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल झाले. महामंडळाच्या बसेस उपलब्ध हात नसल्याने खासगी वाहतुकीने घर गाठावे लागत आहे़ शिवाय ग्रामीण भागातील अनेकांना सणासुदीच्या दिवसांतही घरातून इतर गावांना जाता येत नसल्याने प्रवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकावर शुकशुकाट दिसत आहे.सातव्या वेतन आयोगासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एस्. टी. महामंडळाच्या चालक, वाहक व इतर कर्मचाºयांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून संपाला सुरुवात झाली़ ऐन दिवाळीत संपाचे हत्यार उपसल्याने गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. वर्षभरात सणासुदीच्या दिवशी गावाकडे येणारे चाकरमानी, कामानिमित्त स्थलांतरित झालेली कुटुंब या संपामुळे अडचणीत सापडली आहेत़रत्नागिरी जिल्ह्यात दररोज हजारो बसफेºया सुरु असतात़ या संपामुळे गेल्या तीन दिवसांत सर्वच फेºया बंद आहेत. दिवाळी हा सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जात असून, घरची मंडळी बाहेरगावी वास्तव्याला असलेल्या आपल्या कुटुंबियांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, बससेवाच ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.मुंबई, पुणे येथे असलेल्या अनेक चाकरमान्यांनी रेल्वे, खासगी वाहतूक सेवेचा आधार घेतला आहे. तरीही रेल्वे स्थानकापर्यंत येणारे बहुतांश प्रवाशी ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्यासमोर गावाला जाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. एस.टी. बंद असल्याने अनेक प्रवाशांनी रिक्षा, खासगी वाहतुकीचा आधार घेतला. मात्र, त्यासाठी एस. टी. भाड्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे खिशालाही मोठा फटका बसलेला आहे.एस्. टी. महामंडळाचे चालक, वाहक, अधिकारी आणि इतर कर्मचारी संपावर गेल्याने महामंडळ प्रशासनाला गोरगरिबांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या संपावर अद्याप तोडगा न निघाल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला आपल्या कामानिमित्त शहरात येणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील जनतेची शहरी भागाशी नाळ जोडलेली असल्याने बहुतांशी व्यवहार शहरी भागावर अवलंबून असतात. संपामुळे हे व्यवहारही थांबले आहेत.