शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, लॉकडाऊनपेक्षा कोरोनानेच मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 18:09 IST

CoronaVirus Chiplun Ratnagiri- साहेब मिनी लॉकडाऊन म्हणजे नेमकं काय हो? व्यापाऱ्याने सर्व नियम पाळायचे, घरपट्टी, पाणीपट्टी, लाईटबिल, जीएसटी सारखे कर भरायचे आणि बँकेतील हप्ते, कामगारांची प्रत्येकी ५०० रुपये मोजून आरटीपीसीआर तपासणी हे सर्व व्यापाऱ्यांनी करायचे. मग व्यापाऱ्यांसाठी सरकार व प्रशासन नेमके काय करीत आहे. व्यापाऱ्यांना कोणत्या सुविधा दिल्या आहेत. तेव्हा शासनाने महसूल मिळणाऱ्या दुकानांना सूट देणारा लॉकडाऊन करण्यापेक्षा व्यापारी कोरोनानेच मेलेला बरा, अशा शब्दात व्यापाऱ्यांनी मंगळवारीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. 

ठळक मुद्देसाहेब, लॉकडाऊनपेक्षा कोरोनानेच माराबैठकीत तीव्र शब्दात व्यापाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

चिपळूण : साहेब मिनी लॉकडाऊन म्हणजे नेमकं काय हो? व्यापाऱ्याने सर्व नियम पाळायचे, घरपट्टी, पाणीपट्टी, लाईटबिल, जीएसटी सारखे कर भरायचे आणि बँकेतील हप्ते, कामगारांची प्रत्येकी ५०० रुपये मोजून आरटीपीसीआर तपासणी हे सर्व व्यापाऱ्यांनी करायचे. मग व्यापाऱ्यांसाठी सरकार व प्रशासन नेमके काय करीत आहे. व्यापाऱ्यांना कोणत्या सुविधा दिल्या आहेत. तेव्हा शासनाने महसूल मिळणाऱ्या दुकानांना सूट देणारा लॉकडाऊन करण्यापेक्षा व्यापारी कोरोनानेच मेलेला बरा, अशा शब्दात व्यापाऱ्यांनी मंगळवारीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, दुकाने बंद राहणार आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर व्यापाऱ्यांसह अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही यावरून संभ्रम होता. आदेशाविषयीची स्पष्टता झाल्यानंतर प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत आदींच्या उपस्थित मंगळवारी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक झाली.

बैठकीत शासन आदेशानाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार सूर्यवंशी यांनी मागील लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांनी चोख कामगिरी बजावली होती. गरजूंच्या मदतीसाठी व्यापारी पुढे आले होते. आताही सर्वानी सहकार्याची भूमिका घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोनाच्या अंतिम टप्प्यात सहकार्याची अपेक्षा आहे. प्रशासन दडपशाहीची भूमिका घेणार नाही. मात्र शासन आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.यावेळी ज्येष्ठ व्यापारी बापू काणे, अरुण भोजने, किशोर रेडीज यांनी सर्व कर आम्ही भरायचे. इमान इतबारे धंदा करायचा. व्यापाऱ्यांना काय सुविधा दिल्यात. व्यापाऱ्यांची अवस्था खूप बिकट आहे. असं मारण्यापेक्षा कोरोनाने मेलंलं चांगलं. एसटी बस सेवा सुरू, मग आम्हाला का रोखता?. आम्ही सहकार्य करणारी, नियम पळणारे आहोत, तेव्हा आमचा विचार करा. सर्वच बंद करा, महसूल साठी दुजाभाव करू नका, असे सांगितले. यावर तहसीलदार सूर्यवंशी यांनी तुमच्या सर्व मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविल्या जातील, असे सांगितले. मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी म्हणाले की, हा अनलिमिटेड लॉकडाउन नाही. ३० एप्रिलपर्यंत सहकार्य अपेक्षित आहे.यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष वासुदेव भांबुरे, सुचय रेडीज, सिद्धेश लाड, विश्वास चितळे, राजेंद्र वेस्वीकर, बिलाल पालकर, कांता चिपळूणकर, अनिल दाभोळकर, विजय गांधी, शैलेश वरवाटकर, विजय चितळे, योगेश कुष्टे, श्रीकृष्ण खेडेकर, दिलीप जैन यांच्यासह व्यापारी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी