शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

विविध संगीत प्रकारांनी रंगले गायक-वादक संमेलन

By admin | Updated: May 19, 2016 23:56 IST

जुन्या कलाकारांच्या आठवणी : स्थानिक कलाकारांना प्रेक्षकांची दाद

रत्नागिरी : गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात रविवारी विविध संगीत प्रकारांनी ‘गायक-वादक संमेलन’ रंगले. शास्त्रीय, उपशास्त्रीय, एकलवादन, रत्नागिरीतील संगीतकारांच्या रचना, सुगम संगीत आणि फ्युजन अशा संगीत प्रकारांनी हे संमेलन रंगले.शास्त्रीय गायक प्रसाद गुळवणी, मोहनवीणावादक सुभाष गोसावी, गायिका मुग्धा भट सामंत, जगन्नाथ जोशी, श्रीकृष्ण मुळ्ये, विलास हर्षे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी जगन्नाथ जोशी, मृणाल परांजपे, अमेय आखवे, अजिंंक्य पोंक्षे, ईशानी पाटणकर, रागिनी बाणे, राधा भट, सावनी नाटेकर यांनी शास्त्रीय गायन सादर केले. त्यानंतर उपशास्त्रीय गायनामध्ये आसावरी परांजपे, प्राजक्ता लेले, चैत्राली देसाई यांनी रचना सादर केल्या. उपशास्त्रीय गायनानंतर एकलवादन सादर करण्यात आले. यामध्ये निरंजन गोडबोले, वरद सोहोनी यांनी हार्मोनियम सोलो, अभय भावे, प्रसन्न जोशी यांनी बासरी सोलो, केदार टिकेकरने तबला सोलो, तर शौनक माईणकर याने सतारवादन आणि प्रथमेश तारळकर याने पखवाज सोलो सादर केला. सुगम संगीतात नरेंद्र रानडे, अंजली लिमये, अभिजित भट, सिद्धी बोंद्रे, प्रिया गोखले, केतकी पेठे, अमेय आखवे, स्नेहल वैशंपायन, संगीता शेवाळे, अभय मुळ्ये, तृप्ती महाजन, पर्शराम केळकर, जाई आगाशे यांनी सुगमसंध्या ‘प्रीती ते भक्ती’मध्ये रंगत आणली. संमेलनाची सांगता ‘फ्यूजन’च्या आगळेपणाने झाली. गिटारवादक मिलिंद गोवेकर, शैलेश गोवेकर, सिंंथेसायझरिस्ट राजू किल्लेकर आणि तबलावादक पांडुरंग बर्वे यांनी फ्यूजनचा मेळ घातला होता.संमेलनामध्ये हार्मोनियमसाठी महेश दामले, मधुसुदन लेले, चैतन्य पटवर्धन, संतोष आठवले, मंगेश मोरे, निरंजन गोडबोले, राजेंद्र भडसावळे, तर तबलासाथ प्रथमेश शहाणे, रोहन सावंत, केदार लिंंगायत, निखिल रानडे, सौरभ हर्षे यांनी साथसंगत केली. आयोजनामध्ये प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर, व्हायोलिनवादक उदय गोखले, हार्मोनियमवादक चैतन्य पटवर्धन तसेच संगीततज्ज्ञ विजय रानडे, आॅर्गनवादक विलास हर्षे, गायिका संध्या सुर्वे यांनी विविध संगीत प्रकारातील मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. मीरा भावे, दीप्ती कुवळेकर, गौरी केळकर यांनी निवेदन केले. संमेलनामध्ये डॉक्युमेंट्रीद्वारे रत्नागिरीतील जुन्या दिग्गज कलावंतांच्या आठवणी ताज्या करण्यात आल्या. अभिजित भट यांनी ही डॉक्युमेंट्री तयार केली होती. रंगमंचावर आनंद पाटणकर, मिलिंद टिकेकर, हेरंब जोगळेकर, पांडुरंग बर्वे यांनी रत्नागिरीतील जुन्या कलाकारांच्या आठवणींना उजाळा दिला.आनंद प्रभुदेसाई, तसेच रत्नागिरीत पहिल्यांदा वाद्यवृंद मैफल संकल्पना सुरू करून रूजविणारे विजय डाफळे, नृत्यगुरू बाळासाहेब हिरेमठ, हार्मोनियमवादक श्रीकृष्ण मुळ्ये, शास्त्रीय गायक बंडुकाका भागवत यांचा निवृत्त प्राचार्य डॉ. सुभाष देव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)संमेलनात वेगळेपणसंमेलनात अभंग, भक्तीगीत, भावगीतासह शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि पाश्चात्य संगीत प्रकारही सादर झाले. रत्नागिरीतील संगीतकारांच्या नवीन संगीतरचना सादर झाल्या. यामध्ये संगीततज्ज्ञ विजय रानडे, आनंद पाटणकर, आनंद प्रभुदेसाई, तसेच नितीन लिमये, प्रतीक जोशी, ओंकार संसारे, ओंकार बंडबे, रवींद्र मेहेंदळे, अभिजित नांदगावकर, श्वेता जोगळेकर यांच्या नव्या रचनांनी संमेलनातील वेगळेपण जपले.