पाचल : राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिळंदचे मुख्याध्यापक श्रीकांत गोपाळ गोसावी हे मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा शाळा व्यवस्थापक समिती व ग्रामपंचायत मिळंद यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला.
जवळेथर गावचे सुपुत्र असलेले श्रीकांत गोसावी यांनी शिक्षक म्हणून पहिली शाळा मूर शाळा नं. ३ येथून आपल्या सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर १७ वर्षे जिल्हा परिषद मिळंद शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली. मिळंद गावच्या सरपंच कीर्ती आयरे यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य बाजीराव विश्वासराव, पाचल केंद्रप्रमुख सीताराम कोरगावकर, मिळंद प्रगती मंडळाचे अध्यक्ष वसंत मोरे, प्राथमिक शिक्षक सुभाष चोपडे, संदीप मोरे, नंदकुमार मोटे, ग्रामपंचायत सदस्य स्नेहा गुरव, संजय मोरे, मिळंद वारकरी संप्रदायाचे प्रमुख बाळकृष्ण परटवलकर, शाळा व्यवस्थान समिती अध्यक्ष मधुरा रायबागकर उपस्थित होते. संदीप परटवलकर यांनी सूत्रसंचालन केले.