शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

श्री भैरीबुवाच्या शिमगोत्सवास उद्या प्रारंभ

By admin | Updated: March 11, 2017 18:25 IST

मंदिराची रंगरंगोटी करून फुलांनी सुशोभित

श्री भैरीबुवाच्या शिमगोत्सवास उद्या प्रारंभरत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवाला १२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. शिमगोत्सवामुळे आसपासच्या गावातील अनेक पालख्या श्री भैरी भेटीला येत आहेत. उत्सवामुळे मंदिराची रंगरंगोटी करून फुलांनी सुशोभित करण्यात आले आहे.फाल्गुन पौर्णिमेला मध्यरात्री बारा वाजता श्री देव भैरीची पालखी श्री देवी जोगेश्वरी भेटीसाठी बाहेर पडणार आहे. खालची आळी, महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर दीड वाजता जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी पालखी जोगेश्वरी मंदिरात जाईल. दि.१३ रोजी पहाटे तीन वाजता श्री देवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. झाडगाव सहाणेवरून झाडगाव नाका, टिळक आळी, काँग्रेस भवन, मुरलीधर मंदिर, बंदररोडमार्गे मांडवी भडंग नाका, मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडे वठार, खडपे वठार, तेली आळी, राम नाका, राम मंदिर, राधाकृष्ण नाका, गोखले नाका, विठ्ठल मंदिरकडून होळी घेण्यासाठी जाईल. होळीचा शेंडा घेऊन दुपारी झाडगाव येथे सहाणेवर जाऊन होळी उभारण्यात येईल.दि.१३ रोजी रात्री ९ वाजता धुळवड साजरी करण्यासाठी निशाण निघणार आहे. निशाण झाडगावात फिरून, श्री देवी जोगेश्वरी मंदिरात जाईल, तेथून सहाणेच्या मागील बाजूने झाडगावकर कंपाऊंड, कुंभारवाडा, परटवणे, फगरवठार, वरच्या आळी, लक्ष्मी चौक, गोखले नाक्यातून ढमालणीच्या पारावर येईल. रात्री ११.३० वाजता पारावरून निशाणाचे तीन भाग करण्यात येणार आहेत. एक निशाण घेऊन गुरव मंडळी भैरी मंदिरात, दुसरा भाग गोखले नाका, राधाकृष्ण नाका, मच्छि मार्केट येथे जाईल.पुन्हा फिरून झारणी रोड, राम नाका, तेली आळी, रसाळ यांच्या तिठ्यावर येईल. ढमालणीच्या पारावरून तिसरा भाग पऱ्याची आळी, मारूती आळी, तेली आळीतून रसाळ यांच्या तिठ्यावर येईल. गोडीबाव नाका, खडपेवठार, तेथून निशाण राजिवड्यातील श्री काशि विश्वेश्वर मंदिरात येईल नंतर धुळवड साजरी होणार आहे. तेथून निशाण खडपेवठार, चवंडे वठार, विलणकरवाडी, श्री दत्त मंदिर नाका, घुडेवठार मांडवी येथील वारंग यांच्या घरी थांबेल. दि. १४ रोजी चौगुलेवाडी, कुरणवाडी, पेठकिल्ला राम मंदिर, सांब मंदिर, जोतिबा मंदिर येथे धुळवडीचे दोन भाग होऊन एक भाग राम मंदिराच्या मागील बाजूने जाऊन दुसरा भाग राम मंदिराच्या पुढील बाजूने मिरकरवाडा पोलिस चौकीजवळ, धुळवडीचे दोन भाग एकत्र येतील. पुढे भैरी मंदिर, खालची आळी, दांडा फिशरिज जवळून मुरूगवाडा विठ्ठलादेवी, पंधरा माड, मुरूगवाडा हद्दीजवळ जाऊन गाऱ्हाणे होऊन धुळवड परत मागे फिरून झाडगाव सहाणेजवळील झाडगावकर यांच्या आवारात आलेनंतर धुळवडीचा कार्यक्रम संपेल.दि.१५ ते १७ मार्च पर्यत दुपारी एक वाजेपर्यंत श्री देव भैरीची पालखी झाडगाव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी थांबणार आहे. दि.१४ ते १६ मार्च रोजी रात्री १० नंतर प्रत्येक वाडीतर्फे पारंपरिक पद्धतीत पालखी नाचविण्यात येणार आहे.दि. १६ रोजी भैरीची पालखी मुरूगवाड्यात ग्रामप्रदक्षिणा करणार आहे. झाडगावमार्गे जोगेश्वरी मंदिर, खालची आळी, भैरी मंदिरमार्गे दांडा फॅक्टरी, पंधरा माडपर्यंत जाऊन परत सहाणेवर येईल. त्यानंतर पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल. दि.१७ रोजी श्री भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी सहाणेवरून निघेल. पोलिस कर्मचाऱ्यांची शस्त्रसलामी घेऊन जोगेश्वरी मंदिरातून गाडीतळ , नवलाई-पावणाई मंदिर, शहर पोलिस ठाणे, धनजी नाका, राधाकृष्ण नाका, राम नाका, राम मंदिर, मारुती आळी, गोखले नाका, ढमालणीचा पार, विठ्ठल मंदिर, काँग्रेस भवन, मुरलीधर मंदिर, खालची आळी मार्गे भैरी मंदिराच्या प्रांगणात ११.३० वाजता नेण्यात येईल. रात्री बारा वाजता पालखी स्थानापन्न होऊन धुपारत, गावाचे गाऱ्हाणे होऊन शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.(प्रतिनिधी)