शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

फक्त एक आठवडाच दुकाने बंद ठेवणार, व्यापाऱ्यांनी घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 18:15 IST

Corona virus Ratnagiri Market-गुन्हे दाखल केले तरीही दुकाने चालू ठेवणार, अशी भूमिका रत्नागिरीतील काही व्यापाऱ्यांची कायम असून या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या मिनी लॉकडाऊनला कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, रत्नागिरी शहर व्यापारी संघाच्या पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंगळवारी भेट घेतली असता सामंत यांनी आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देफक्त एक आठवडाच दुकाने बंद ठेवणारव्यापाऱ्यांनी घेतला निर्णय

रत्नागिरी : गुन्हे दाखल केले तरीही दुकाने चालू ठेवणार, अशी भूमिका रत्नागिरीतील काही व्यापाऱ्यांची कायम असून या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या मिनी लॉकडाऊनला कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, रत्नागिरी शहर व्यापारी संघाच्या पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंगळवारी भेट घेतली असता सामंत यांनी आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद राहिल्याने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक कर्जांचे हप्तेही भरता आलेले नाहीत. गेल्या वर्षीच्या नुकसानीचा फटका अजूनही व्यापारी वर्गाला बसलेला आहे. काही महिन्यापूर्वी सुरू झालेले उद्योग व्यवसाय अजूनही सुरळीत झालेले नाहीत. असे असतानाच आता पुन्हा मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल केलेत तरी आम्ही दुकाने सुरू ठेवणारच असा सूर सर्वच व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत असून या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनला तीव्र विरोध केला आहे.

जिल्हा प्रशासनाचे आदेश जाहीर होताच रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या कथन केल्या. मागील लॉकडाऊनमध्ये व्यापारी देशोधडीला लागला असून आता करण्यात आलेल्या नियमांमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. आता तोटा सहन करण्याची आमची क्षमता संपली असे या व्यापाऱ्यांनी सांगितले.यावर मंत्री उदय सामंत यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण मांडू असे या व्यापाऱ्यांना आश्वासन दिले. उदय सामंत यांच्या विनंतीनुसार या व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले असून आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.व्यापाऱ्यांमध्ये मतभेदरत्नागिरी शहरात सध्या व्यापाऱ्यांमध्ये दुमत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही व्यापाऱ्यांचा दुकाने बंद ठेवण्यास विरोध आहे. अशा परिस्थितीत सर्वच व्यापारी बंदचा निर्णय मानणार की विरोध करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारRatnagiriरत्नागिरी