रत्नागिरी : समर्थ एक्झॉटिकातर्फे घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत डाॅ. शिवानी सचिन पानवलकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. निलेश शामकांत मलुष्टे द्वितीय आणि स्वाती अश्विन शेट्ये यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
'इंटरनॅशनल फोटोग्राफी दिवस' या निमित्ताने शिवाजीनगर रत्नागिरी येथील ‘समर्थ एक्झॉटिका’ या झाडांच्या नर्सरीतर्फे फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आपल्या बागेचा किंवा झाडांचा फोटो काढून पोस्ट करणे, असा या स्पर्धेचा विषय होता. स्पर्धेमध्ये एकूण ८९ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण गौतम बाष्ट्ये यांनी केले. प्रथमतः एकच पारितोषिक देण्याचे ठरविले होते, परंतु स्पर्धकांच्या प्रतिसादामुळे अधिक दोन परितोषिके वाढविण्यात आली आहेत, असे नर्सरीच्या प्रोप्रायटर कोमल तावड़े यांनी सांगितले.
विजेत्यांना समर्थ एक्झॉटिकातर्फे खरेदीसाठी गिफ्ट व्हाउचर देण्यात येतील. प्रथम पारितोषिक १,५०० रुपये गिफ्ट व्हाउचर; द्वितीय पारितोषिक १,००० रुपये गिफ्ट व्हाउचर आणि तृतीय पारितोषिक ५०० गिफ्ट व्हाउचर देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
फोटो मजकूर
रत्नागिरीतील समर्थ एक्झॉटिकातर्फे घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेत डाॅ.शिवानी पानवलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.