शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

शिवसेनेला टक्कर मनसेची

By admin | Updated: October 2, 2014 00:09 IST

सावंतवाडीत होणार बहुरंगी लढत, सर्वाधिक लक्षवेधी मतदार संघ, ८ उमेदवार रिंगणात

अनंत जाधव - सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून प्रमुख पक्षांचे पाच उमेदवार रिंगणात असले तरी खऱ्या अर्थाने लढत शिवसेना विरूद्ध मनसे यांच्यात होण्याची शक्यता आहे. कारण पक्ष बदलू म्हणून राष्ट्रवादीच्या सुरेश दळवींवर शिक्का बसला असून, ज्येष्ठता डावलत तालुकाध्यक्ष बाळा गावडे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजीचे सूर उमटत आहेत. अनेकजण उघडपणे अन्य उमेदवारांना मदत करीत आहेत, तर काहीजण दुसऱ्या पक्षांमध्ये उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे सध्यस्थितीत दिसून येत आहे.बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम वेळेपर्यंत सावंतवाडी मतदारसंघातून प्रभाव पडेल, अशा वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यांनावगळता एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. माजी आमदार राजन तेली यांनी भाजपाकडून अर्ज दाखल केल्याने त्यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेतला आहे. मात्र, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील चुरस ही शिवसेना व मनसे यांच्यावरच अवलंबून असून, अन्य पक्षांच्या उमेदवारांचे चेहरे अंतिम वेळेपर्यंत मतदारापर्यंत पोहोचले नाहीत. ऐन अर्ज भरण्याच्या आधी आघाडी व युती तुटल्याने सर्वच पक्षांना उमेदवार शोधण्याची मोठी घाई झाली होती. सावंतवाडी मतदारसंघातील चित्र काही वेगळे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली यांना ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तर युती तुटल्याने भाजप उमेदवारांच्या शोधात असतानाच तेलींच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली.दुसरीकडे राष्ट्रवादी राजन तेलींना उमेदवारी देणार असे वाटत असतानाच शिवसेनेच्या सुरेश दळवी यांनी अनपेक्षितरित्या राष्ट्रवादीमध्ये दाखल होत उमेदवारी मिळविली. पण, दळवींवर सतत पक्ष बदलू आरोप होत राहिल्याने मतदार राजा विचलित झाल्याचे दिसत आहे. माजी आमदार दीपक केसरकर हे शिवसेनेत गेल्यामुळे सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्लेमध्ये राष्ट्रवादी चांगलीच खिळखिळी झाली आहे. त्यातच आघाडी तुटल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजन झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मागे पडत असल्याचे दिसून येत आहे.काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, वसंत केसरकर, विकास सावंत आदी ज्येष्ठ मंडळी असतानाही या सर्वांना डावलून बाळा गावडे यांना उमेदवारी देण्यात आली. यातील प्रवीण भोसले यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, तर वसंत केसरकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी सध्या शांत राहण्याच्याच भूमिकेत आहेत. गावडे यांच्या उमेदवारीमुळे ज्येष्ठ नेत्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांमध्ये निरूत्साह असून, अनेक कार्यकर्ते हे कधी भाजप, तर शिवसेना पक्षाच्या व्यासपीठावर दिसत आहेत. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.पुढील आठ दिवसात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कशाप्रकारे मतदारावर प्रभाव टाकेल, यावर पुढील गणित अवलंबून राहणार आहेत.सावंतवाडी मतदारसंघात परशुराम उपरकर (मनसे), दीपक केसरकर (शिवसेना), राजन तेली (भाजप), बाळा गावडे (काँॅग्रेस), सुरेश दळवी (राष्ट्रवादी काँग्रेस) आदी प्रमुख पक्षांबरोबरच किशोर लोंढे, अजिंक्य गावडे, उदय पास्ते, संजय देसाई हे उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उभे ठाकले आहेत.दीपक केसरकर यांनी आधीच शिवबंधन बांधून घेतले होते. मात्र राजन तेली यांनी आयत्यावेळी भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलच नाही तर राज्याचे लक्ष असलेला मतदार संघ म्हणून सावंतवाडीकडे पाहिले जात आहे.फोटो : 0१ एसडब्लूडी 0६दीपक केसरकर फोटो : 0१ एसडब्लूडी 0७परशुराम उपरकरफोटो : 0१ एसडब्लूडी 0८बाळा गावडेफोटो : 0१ एसडब्लूडी 0९सुरेश दळवीफोटो : 0१ एसडब्लूडी १0राजन तेलीसावंतवाडी एकूण मतदार २,0२, ८३५नावपक्षबाळा गावडेकाँग्रेसदीपक केसरकरसेनाराजन तेली भाजपसुरेश दळवी राष्ट्रवादी कॉँग्रेस परशुराम उपरकरमनसेकिशोर लोंढे अपक्षअजिंक्य गावडेअपक्षउदय पास्तेअपक्ष