शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल कृतज्ञता, 'बॅनर'वर उद्धव ठाकरेंचा फोटो; चिपळूण शहर प्रमुखांचा बॅनर चर्चेत

By संदीप बांद्रे | Updated: July 22, 2022 15:21 IST

शहर प्रमुख सकपाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा फलक उभारल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

संदीप बांद्रेचिपळूण : तब्बल ४० आमदारांच्या बंडखोरीने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारणीत बदल देखील केले आहेत. असे असतानाच चिपळूणच्या शहर प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लावलेला बॅनर चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या बॅनर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे देखील फोटो आहेत.चिपळूणचे शहर प्रमुख उमेश सकपाळ यांनी नगर परिषदेसमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ जुलै २०२१ मधील महापुराच्या वेळी रुग्णवाहिकेसह वस्तू व साहित्य स्वरूपात चिपळूणला केलेल्या मदतीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा बॅनर उभारला आहे. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांचे फोटो असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन शिंदे गटाने राज्यात भाजप सोबत सत्ता स्थापन केली. या घडामोडीनंतर शिवसेना अक्षरशः हादरून गेली आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणातही उलथापालथ सुरू झाली. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार उदय सामंत व योगेश कदम हे दोघेही शिंदे गटात सहभागी झाले. या घटनेने शिंदे गटाला मोठे बळ मिळालेले असतानाच या भागातील सर्वसामान्य शिवसैनिक गोंधळून गेला आहे.  शिवसैनिकाला सावरून घेण्यासाठी माजी केंद्रीय मत्री अनंत गिते यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच रत्नागिरी व चिपळूण येथे नुकताच मेळावे घेतले. या मेळाव्यात गद्दारांना बाटली बंद करण्याची शपथ घेण्यात आली. मात्र आता शहर प्रमुख सकपाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा फलक उभारल्याने त्याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.चिपळूण नगर परिषदेसमोरील कै. खेडेकर क्रीडा संकुलाच्या ठिकाणी भर बाजारपेठेत हा फलक उभारल्याने तो तितकाच लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे आता या विषयी शिवसेनेची कोणती प्रतिक्रिया समोर येते व सर्वसामान्य शिवसैनिक या बहुचर्चित बॅनरचा काय अर्थ लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे