शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय खो-खो पटू अपेक्षा सुतार हिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 13:26 IST

 राष्ट्रीय खो-खो पटू रत्नकन्या अपेक्षा अनिल सुतार हिला महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.

मेहरून नाकाडे

रत्नागिरी :  राष्ट्रीय खो-खो पटू रत्नकन्या अपेक्षा अनिल सुतार हिला महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. अपेक्षाने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

अपेक्षा पाचवीत असल्यापासून खो-खो खेळत आहे. रा.भा.शिर्के शाळेची विद्यार्थिनी असून तिला विनोद मयेकर, पंकज चवंडे या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. अपेक्षाने वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केली असून उत्कृष्ट खेळामुळे तिने विविध गटातून जिल्हा, विभागिय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. गतवर्षी नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत अपेक्षा सहभागी झाली होते, तेथेही तिने सुवर्णपदक मिळविले होते.  मार्च मध्ये आसाम येथे झालेल्या चौथ्या आशियाई स्पर्धेत आसाम येथे चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले होते.

अपेक्षाला तिच्या उत्कृष्ट खेळामुळे खो-खो क्षेत्रातील मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. १८ वर्षे वयोगटातील जानकी पुरस्कार, खुल्या गटातील राणी लक्ष्मीबाई पुरस्कार अपेक्षाने मिळविला आहे. आता २०२१-२२ चा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. अपेक्षाच्या यशाने रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र खो खो संघटनेचे माजी सचिव संदीप तावडे यांचे अपेक्षाला मार्गदर्शन लाभत आहे. अपेक्षा हिच्या निवडीबद्दल सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.