शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

परिस्थितीनंच तिला घडवलं, परीक्षेत चमकवलं!

By admin | Updated: June 18, 2014 00:55 IST

शिक्षकांचा आणि आईवडिलांचा विश्वास सार्थ ठरवला

उमेश पाटणकर / रत्नागिरी रत्नागिरी : तिनं परिस्थितीशी दोन हात केले, परिश्रमाला ती घाबरली नाही आणि हे करताना पुस्तकांशी नातं तिनं तोडलं नाही आणि यशानंही तिची साथ सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिच्या पदरात यशाचं भरभरून माप टाकलं. ७३.०८ टक्के गुण मिळवत तिने आपल्या शिक्षकांचा आणि आईवडिलांचा विश्वास सार्थ ठरवलाय. तालुक्यातील फणसवळे येथील प्रीती चंद्रकांत पड्यार असं या यशस्विनीचं नाव! शाळेच्या वेळात अभ्यास आणि अन्यवेळी घरकाम प्रसंगी मोलमजुरी करुन स्वत:च्या शिक्षणाच्या खर्चासह घरखर्चाला हातभार लावला. पुढील शिक्षणाची दिशा ठरली नसली तरी संधी मिळाल्यास उच्च शिक्षण घ्यायचा ती विचार करतेय. फणसवळेसारख्या गावात शिक्षणाची व्यवस्था नसल्याने प्रीतीने आपले नाव गोदूताई जांभेकर विद्यालयात दाखल केले. शिक्षणाची प्रचंड इच्छा असताना घरच्या कामांची जबाबदारीसाठी उचलावी लागली. स्वत:सह भावंडांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे आणि घरखर्चाला हातभार लागावा यासाठी तिने कामाच्या आणि अभ्यासाच्या वेळा ठरवून टाकल्या. रविवार आणि अन्य सणांच्यानिमित्ताने मिळणाऱ्या सर्व सुट्या मोलमजुरी जाऊ लागल्या. मोठी सुट्टीही कामातच संपत असे. शाळेच्या दिवशी सकाळ-संध्याकाळ घरातील कामांचा निपटारा तिने स्वत:हून सुरु केला. शाळेच्या वेळाव्यतिरिक्त बस प्रवासातील वेळ हाच काय तो तिच्या अभ्यासाचा वेळ. गृहपाठ अपूर्ण आहे म्हणून सुरुवातीच्या काळात शिक्षकांचा ओरडाही तिने खाल्ला. पण वर्गात मिळणारी उत्तरे आणि परीक्षेतील गुण यामुळे ती आपसुकच शिक्षकांची लाडकी झाली. सुरुवातीचे काही महिने शाळेतले जादा तास तिने चुकवले ते घरच्या कामासाठी. पण शिक्षकांनी त्यासाठीही तिला मुभा दिली. नंतर मात्र तिच्या आईने व बहिणीने दहावीचे महत्व ओळखून घरातील काम तिच्याकडून काढून घेतले. यामुळे तिला शाळेतील जादा तासांना उपस्थित राहता येऊ लागले. हलाखीच्या परिस्थितीत तिने मिळवलेले यश म्हणजे गोदूताई जांभेकर विद्यालयातील खरी शिकवण आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.