शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील सिद्धेश तटकरेची प्रो-कबड्डीत धडक, बंगाल वॉरियर्सच्या संघात झाली निवड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:51 IST

संगमेश्वर तालुक्यातील पहिलाच खेळाडू

सचिन मोहितेदेवरुख : ध्येय उराशी बाळगून त्याचा पाठलाग करणारी ध्येयवेडी माणसं आपलं ध्येय साध्य करतातच. याच जिद्दीच्या आणि कठोर मेहनतीच्या जोरावर संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणेसारख्या ग्रामीण भागातील सिद्धेश प्रमोद तटकरे या कबड्डीपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. मेहनतीच्या जोरावर त्याची बंगाल वॉरियर्सच्या संघात निवड झाली आहे. प्रो-कबड्डीत निवड झालेला तो तालुक्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.लाल मातीतील या मर्दानी खेळात तालुक्यातील अनेक खेळाडू निर्माण झाले आहेत. साडवली सह्याद्रीनगर गावातील प्रशांत सुर्वे यांच्यासारखे काही व्यावसायिक खेळाडू नावारूपाला आले. याच लाल मातीतून सिद्धेश तटकरे हा खेळाडू घडला आहे. त्याला शालेय जीवनापासूनच कबड्डीची आवड हाेती. त्याच्या वडिलांनाही कबड्डीची आवड असल्याने इथूनच त्याच्या कबड्डीच्या प्रवासाला सुरूवात झाली. माध्यमिक विद्यामंदिर, ताम्हाणे येथे दहावीपर्यंत शिक्षण घेत असताना अभिजीत सप्रे तर दादासाहेब सरफरे बुरंबी-शिवने विद्यालयाचे शिक्षक सुहास पाब्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ताे घडत गेला.याच दरम्यान तो जाखमाता ताम्हाणे, सोळजाई देवरुख संघातून खेळत होता. त्यावेळी त्याला संतोष उर्फ बाबा दामुष्टे यांचे मार्गदर्शन मिळाले. मुंबईत आल्यानंतर नाेकरी सांभाळून अंकुर, युनियन बँक, न्यू इंडियन इन्श्युरन्स या संघातून ताे खेळू लागला. सहा महिन्यांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या संघातूनही ताे खेळला. मुंबईत त्याला प्रशांत सुर्वे, अनिल घाटे, मिलिंद कोलते, सुभाष पाटील, अक्षय मेरठ, महेश साप्ते, मीनल पालांडे, जसपाल राठोड, गणेश म्हात्रे यांचे मार्गदर्शन मिळाले.

मी कधीही सण, उत्सव पाहिले नाहीत. ध्येय डोळ्यासमोर ठेवून सण आणि उत्सवाला गौण स्थान दिले. खेळासाठी फिटनेस आणि स्वतःवर फोकस महत्त्वाचा आहे. फिटनेससाठी मला प्रशांत साळुंखे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. माझ्या पाठोपाठ संगमेश्वरमधील आणखी खेळाडूंनी प्रो-कबड्डीमध्ये यावे. त्यासाठी एकत्र खेळा, खूप कष्ट करा आणि उद्दिष्ट निश्चित करून यश गाठा. - सिद्धेश तटकरे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPro-Kabaddiप्रो-कबड्डी