लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हमध्ये एमएमएस या पदव्युत्तर विभागातील पाच विद्यार्थ्यांची ॲपेक्स ॲक्टसॉफ्ट या कंपनीमध्ये निवड झाली आहे. यामध्ये या विभागातील संदेश परशराम, ऋतुजा पेवेकर, तस्मिया मुजावर, अनघा टिकेकर व प्रतीक्षा सामंत हे विद्यार्थी निवडीत पात्र ठरले आहेत.
यासोबत संगणक शाखेतील पूजा रुके व सोनाली शिंदे, तर मेकॅनिकल विभागातील संकेत जाधव व रोहन करंडे या विद्यार्थ्यांनीही या कंपनीची निवड चाचणी यशस्वीपणे पार केली आहे. निवड प्रक्रियेत ग्रुप डिस्कशन, बुद्धिमत्ता परीक्षा, टेक्निकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यू यासारख्या चाचण्या घेतल्या गेल्या. या सर्व फेऱ्यांमधून महाविद्यालयाच्या एकूण नऊ विद्यार्थ्यांची कंपनीने निवड केली आहे.
विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी विभागप्रमुख प्रा. मोहन गोसावी, समन्वयक प्रा. स्नेहल मांगले, प्रा. आशिष सुवारे यांनी प्रयत्न केले. या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष रवींद्र माने, कार्यकारी अध्यक्षा नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी अभिनंदन केले आहे.