शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

चुरशीने सरासरी ७० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील २१५ पैकी १४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी ४७३ केंद्रांवर सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार चिपळूण आणि दापोली तालुक्यांत सर्वाधिक मतदान झाले आहे. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.जिल्ह्यातील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील २१५ पैकी १४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी ४७३ केंद्रांवर सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार चिपळूण आणि दापोली तालुक्यांत सर्वाधिक मतदान झाले आहे. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.जिल्ह्यातील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, यापैकी ६१ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. १२ ग्रामपंचायतींत सरपंचपद, तर १३ ग्रामपंचायतींत सदस्यपदे बिनविरोध झाली आहेत. काही ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी अर्जच आलेले नाहीत. त्यामुळे आता अंतिमत: जिल्ह्यातील २१५ ग्रामपंचायतींपैकी १४८ ग्रामपंचायतींच्या एकूण ६६५ प्रभागांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात सरंपचपदांसाठी ४०८, तर सदस्यपदांसाठी २०३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच २९ ग्रामपंचायतींत केवळ सरपंचपदासाठी आणि २३ ग्रामपंचायतींत केवळ सदस्यांच्या निवडणुकांसाठी सोमवारी मतदान झाले.जिल्ह्यात ४७३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. किरकोळ घटना वगळता उर्वरित ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. दुपारी ३.३० वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले.तालुक्यातील ग्रामीण भागातून अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत जिल्हा कार्यालयाकडे प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. चिपळूण, दापोली या तालुक्यांमध्ये सर्वांत जास्त, तर राजापूर तालुक्यात कमी मतदान झाले आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहेत. या यंत्रांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.जिल्ह्यातील तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने त्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी आज, मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. यासाठीही पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.