शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसाठी निकृष्ट धान्य ठेवणाऱ्या गोडावूनला सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:40 IST

Food and Drug administration, ratnagirinews अंगणवाडीतील मुले आणि गरोदर महिलांना देण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्रकार माजी खासदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला. त्यानंतर बुधवारी रात्री उशिराने अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत या गोदामाला सील ठोकले आहे.

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासनाकडून रात्री उशिरा कारवाई रत्नागिरीतील भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकून केला पर्दाफाश

रत्नागिरी : अंगणवाडीतील मुले आणि गरोदर महिलांना देण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्रकार माजी खासदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला. त्यानंतर बुधवारी रात्री उशिराने अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत या गोदामाला सील ठोकले आहे.धान्यात खडे व कचरा आढळला असून, टोके पडलेले हरभरे व मसुरडाळ पॅकबंद करण्यात येत असल्याचा प्रकार युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला. या धान्याबरोबर देण्यात येणारी हळद व मसाल्याची पॅकेटस् ठेकेदाराकडून उपलब्ध करुन देण्यात आली नाहीत. रत्नागिरी औद्योगिक वसाहतीत पॅकिंग होत असताना, वर पत्ता मात्र चिपळूण व मुंबईतील असल्याचे या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांसमोर उघड केले.एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या नावाखाली मिरजोळे एमआयडीसीमधील गोडावूनमध्ये अंगणवाडीतील बालके व गरोदर महिलांना देण्यात येणारे धान्य पॅकिंग होत आहे. अनेक पाकिटांवर तारीख, पॅकिंग नंबर टाकला जात नसल्याची माहिती भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन व उपाध्यक्ष नंदू चव्हाण यांना मिळाली.

त्यांनी माजी खासदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा पदाधिकाऱ्यांसह राजू कीर, नित्यानंद दळवी, हर्षद घोसाळकर, विकी जैन, संकेत बापट, संजय आयरे यांनी गोडावूनला भेट दिली असता गव्हाची फुटलेली पोती, त्यामध्ये दगडांसह कचरा मोठ्या प्रमाणात असल्याचे लक्षात आले.हरभरा व मसूरडाळीतही टोके व कचरा आढळला. रत्नागिरी ग्रामीण पोलीस तातडीने तेथे दाखल झाले. मात्र ठेकेदार उशिरापर्यंत आले नाहीत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत घटनास्थळी अधिकारी दाखल झाले नव्हते. सव्वासहा वाजल्यानंतर महिला व बालविकास अधिकारी आर. व्ही. काटकर यांनी गोदामाला भेट देऊन पाहणी केली. 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागRatnagiriरत्नागिरी