शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘कुटुंबकल्याण’च्या शस्त्रक्रियेला ‘कात्री’

By admin | Updated: March 25, 2016 00:05 IST

नादुरुस्त इमारत : लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यथा

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नादुरुस्त झाल्यामुळे तब्बल दोन वर्षे याठिकाणी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. पावसाळ्यापूर्वी या इमारतीची दुरुस्ती न झाल्यास या ठिकाणी रुग्णांवर उपचार करणेही अवघड होणार आहे.लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत व कर्मचारी वसाहतीची वाताहत हे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. मात्र, अद्यापही या इमारतीच्या दुरूस्तीकडे शासनाने लक्ष दिले नसल्याचे दिसून येत आहे. हे प्राथमिक केंद्र महामार्गावर असल्याने अपघात वा शवविच्छेदनासाठी या केंद्राचा प्रामुख्याने आधार घेतला जातो.याचबरोबर आसपासची अकरा गावे, वस्त्या व अन्य उपकेंद्रे या ठिकाणी जोडली गेली असल्याने इथे रुग्णांची सततची ये-जा असते. दीडशेहून अधिक विंचूदंश तर तितक्याच सर्प व श्वानदंशाच्या रुग्णांनी येथे वर्षभरात उपचार घेतले आहेत.या केंद्रात चालणारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मागील दोन वर्ष बंद राहावी, ही दखल घेण्याजोगी बाब रुग्णकल्याण समिती वा जिल्हा आरोग्य विभागाच्या नजरेतून सुटावी ही शोकांतिकाच म्हणावी लागेल, असे येथील रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी येथे स्त्री शस्त्रक्रिया झाल्याचे वैद्यकीय अधिकारी अविनाश ढगे यांनी सांगितले. याचाच अर्थ इथे सोय असतानाही रुग्णांना कळंबणी अथवा कामथे येथे जावे लागले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. आजही केवळ उन्हाळा आहे, वातावरण कोरडे आहे, म्हणून येथे शस्त्रक्रिया होऊ शकली. नजीकच्या काळात या आरोग्य केंद्राची दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात शस्त्रक्रिया करणे दूरच रुग्ण तपासणेही अवघड होणार असल्याची भीती वर्तविली जात आहे. (वार्ताहर)ढगे : मे अखेरपर्यंत दुरुस्ती होणारलोटे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून, कामाची निविदा देखील झाली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होऊन मे अखेरपर्यंत याची दुरुस्ती होण्याची आशा आहे.-डॉ. अविनाश ढगे,वैद्यकीय अधिकारीसंतप्त प्रतिक्रियालोटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे प्रशासनाने यापूर्वी लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहेत.